विशाळगडासह छत्रपती शिवरायांचे गड-दुर्ग अतिक्रमणमुक्‍त व्‍हावेत ! – हिंदु जनजागृती समिती

पुणे येथील पारगाव आणि मंचर येथे विशाळगड अतिक्रमणमुक्‍तीसाठी मूक आंदोलन !

पारगाव येथे आंदोलन करतांना हिंदुत्‍वनिष्‍ठ

पुणे, ४ ऑगस्‍ट (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज आणि असंख्‍य मावळे यांनी प्राणांचे बलीदान देऊन हिंदवी स्‍वराज्‍य स्‍थापन केले आणि धर्मरक्षण केले. आज त्‍याच गडांवर अतिक्रमणे होत आहेत. विशाळगडासह सर्वच गड-दुर्ग अतिक्रमणमुक्‍त करण्‍यात यावेत, असे प्रतिपादन धर्माभिमानी श्री. गणेश ताकवणे यांनी केले, तसेच ‘हिंदूंवर गुन्‍हे नोंद करून केलेली कारवाई रहित करावी’, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने दौंड तालुक्‍यातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक (पारगाव) येथे २ ऑगस्‍ट या दिवशी मूक आंदोलन घेण्‍यात आले. या वेळी श्री. शामराव आबा ताकवणे (तंटामुक्‍ती अध्‍यक्ष, पारगाव सालू मालू), ‘संतराज अर्थमुव्‍हर्स’चे श्री. प्रशांत मारुति बोत्रे, मोरया उद्योगसमूहाचे अध्‍यक्ष श्री. सागर ताकवणे यांसह ३५ ते ४० धर्माभिमानी उपस्‍थित होते.

मंचर येथे आंदोलन करतांना हिंदुत्‍वनिष्‍ठ

 

२ ऑगस्‍ट या दिवशी मंचर येथेही छत्रपती शिवाजी महाराज चौकात मूक आंदोलन घेण्‍यात आले. या वेळी भाजपचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष श्री. नामदेव आण्‍णा खैरे, उद्योजक श्री. शंकरशेठ पटेल, ‘कमलजादेवी देवस्‍थाना’चे विश्‍वस्‍त श्री. मार्तंड डेरे, ‘तपनेश्‍वर देवस्‍थान’चे विश्‍वस्‍त श्री. संतोष बाणखेले आदी मान्‍यवरांसह २५ हून अधिक हिंदुत्‍वनिष्‍ठ आंदोलनात सहभागी झाले होते.