यशश्री शिंदे हिच्या हत्येविरोधात नाशिक, येवला आणि निफाड येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी !
उपस्थित संघटनानाशिक : रणरागिणी शाखा, भारतीय स्त्री शक्ती, हिंदु जनजागृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सकल हिंदू समाज, विश्व हिंदू सेना, ब्राह्मण महासंघ, हिंदू जनसंपर्क कार्यालय, निर्भय महाराष्ट्र पार्टी येवला : रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती, सकल हिंदू समाज, रा.स्व. संघ, बजरंग दल, अखिल भारतीय छावा संघटना, भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि शिवसेना निफाड : हिंदु जनजागृती समिती, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद |
नाशिक – उरण येथील यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणारी हत्या धर्मांधाने केली. या घटनेचा निषेध नाशिक, येवला आणि निफाड येथे प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आला. नाशिक येथे या संदर्भात आंदोलनही करण्यात आले.
राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, या प्रमुख मागणीसह यशश्री शिंदे प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशी द्यावी, राज्यातून महिला आणि मुली सहस्रोंच्या संख्येने बेपत्ता होण्यामागे असलेल्या षड्यंत्राची स्वतंत्र पथक नेमून चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण द्यावे, आतंकवाद्यांना विदेशातून होणार्या अर्थपुरवठ्याची चौकशी करावी, मुसलमान युवक आणि हिंदु युवती यांच्या प्रेमप्रकरणाच्या तक्रारी ‘लव्ह जिहाद’ म्हणून नोंदवल्या जाव्यात, उत्तरप्रदेशच्या धर्तीवर ‘अँटी रोमिओ स्कॉड’सारखी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.
नाशिक येथे नायब तहसीलदार नरेंद्र जगताप यांनी, येवला येथेही नायब तहसीलदार आबा महाजन यांनी, तर निफाड येथे तहसीलदार विशाल नाईकवडे यांनी निवेदन स्वीकारले.