‘लाडक्‍या बहिणीं’च्‍या सुरक्षेसाठी आधी ‘लव्‍ह जिहाद’विरोधी कायदा करा ! – सांगली येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनात मागणी

  • आंदोलनाला जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

  • उरण येथील यशश्रीची निर्घृण हत्‍या करणार्‍या ‘लव्‍ह जिहाद्या’ला फाशी देण्‍याचीही मागणी !

आंदोलनात ‘लव्‍ह जिहाद’च्‍या विरोधात बोलतांना श्री. अविनाश मोहिते

सांगली, ४ ऑगस्‍ट (वार्ता.) – महाराष्‍ट्र सरकारने ‘मुख्‍यमंत्री लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे; मात्र सध्‍या ‘लव्‍ह जिहाद’च्‍या धोक्‍यामुळे हिंदु युवती आणि महिला अजूनही असुरक्षित आहेत आणि त्‍यांच्‍या निर्घृण हत्‍या चालूच आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेच्‍या आधी ‘बहिणींना सुरक्षा द्या’ बहिणींच्‍या सुरक्षेसाठी राज्‍यात तात्‍काळ ‘लव्‍ह जिहाद’ आणि धर्मांतरविरोधी कायदा करावा, अशी मागणी ३ ऑगस्‍ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने मारुति चौक येथे आयोजित ‘हिंदु-राष्‍ट्र जागृती आंदोलना’त करण्‍यात आली. या वेळी हिंदुत्‍वनिष्‍ठांनी हातात प्रबोधनपर फलक धरून दिलेल्‍या विविध घोषणांमुळे मारुति परिसर दणाणून गेला. या आंदोलनाला जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला.

उरण येथील कु. यशश्री शिंदे हिची हत्‍या करणार्‍या नराधमाला तात्‍काळ भरचौकात फाशी द्यावी, ही मागणीही करण्‍यात आली.

‘लव्‍ह जिहाद’च्‍या विरोधी आंदोलनात बोलतांना श्री. विनायक येडके

उपस्‍थित मान्‍यवर…

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख श्री. उमाकांत कार्वेकर, मिरज उपतालुकाप्रमुख श्री. विनायक ऐडके, सांगली शहरउपप्रमुख श्री. कुमार राठोड, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्‍य श्री. अविनाश मोहिते, उद्योजक श्री. दिगंबर कोरे, हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. नितीन भोरावत, आदमापूर (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील संत बाळूमामा मंदिराच्‍या सौ. वैशालीताई रसाळ, भाजपच्‍या माजी नगरसेविका अधिवक्‍त्‍या (सौ.) स्‍वाती शिंदे, माजी नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर, श्री. पृथ्‍वीराज पवार, सर्वश्री रोहित पाटील, सागर गलांडे, शुभम होसमठ, सुरेश ठेंगले, अभिजित कोडग, महेश चव्‍हाण, अमित कुटे, शुभम खोत, संदीप जाधव, सूरज मगदूम उपस्‍थित होते.

आंदोलनाला अधिवक्‍त्‍या (सौ.) स्‍वाती शिंदे यांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला.

मान्‍यवरांचे मनोगत…

श्री. उमाकांत कार्वेकर म्‍हणाले की, ‘लव्‍ह जिहाद’च्‍या विरोधात हिंदूंनी जागृत होणे हेच औषध आहे. ‘लव्‍ह जिहाद’ प्रकरणात हिंदु मुलींवर अत्‍याचार करून त्‍यांचा वापर आणि त्‍यांची विल्‍हेवाट लावणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई केली पाहिजे.

श्री. दिगंबर कोरे म्‍हणाले की, ‘लव्‍ह जिहाद’ प्रकरणात जाणूनबुजून हिंदु मुली आणि महिला यांची क्रूर पद्धतीने हत्‍या करण्‍यात येत आहे. उरण येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. यामुळे या विरोधात हिंदूंनी जागे होणे आवश्‍यक आहे.

श्री. विनायक येडके म्‍हणाले की, धार्मिक आचरण हे आत्‍मसंरक्षणार्थ कसे जगायचे, हे आपल्‍याला शिकवते. दुर्दैवाने ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्‍ह जिहाद’ यांना हिंदूच खतपाणी घालत आहेत. ‘लव्‍ह जिहाद’च्‍या विरोधात सर्वांनी संघटित व्‍हावे.

श्री. अविनाश मोहिते म्‍हणाले की, ‘लव्‍ह जिहाद’च्‍या घटना घडत असतांना हिदूंनी बांगड्या घालून बसायचे का ? बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्‍यांची धर्मांधांकडून खुलेआम हत्‍या केली जात आहे. त्‍यामुळे हिंदुत्‍वनिष्‍ठांवरील अन्‍याय आणि ‘लव्‍ह जिहाद’ घटनांच्‍या विरोधात हिंदूंंनी एकत्र आले पाहिजे.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई आणि सनातन संस्‍थेच्‍या श्रीमती मधुरा तोफखाने यांनी मनोगत व्‍यक्‍त केले.

भाजपच्‍या महिला आघाडीच्‍या उपाध्‍यक्षा अन् अधिवक्‍त्‍या (सौ.) स्‍वाती शिंदे यांनी महिला कार्यकर्त्‍यांसह आंदोलनस्‍थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. त्‍यांनीही ‘लव्‍ह जिहाद’च्‍या विरोधात कायदा झालाच पाहिजे, अशी मागणी केली.
आंदोलनाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद देतांना जिज्ञासू
आंदोलन करतांना हिंदुत्‍वनिष्‍ठ

क्षणचित्रे…

१. अनेक जिज्ञासू आंदोलन संपेपर्यंत उपस्‍थित होते.

२. अनेक जिज्ञासूंनी थांबून ‘लव्‍ह जिहाद’च्‍या विरोधात उत्‍स्‍फूर्तपणे प्रतिक्रिया दिली.

३. आंदोलनाच्‍या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्‍त होता.