हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने बिहार, झारखंड आणि बंगाल या राज्‍यांमध्‍ये भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्‍सव साजरा !

कोलकाता (बंगाल) येथे हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने गुरुपौर्णिमेचे आयोजन

कोलकाता –येथे गुरुपौर्णिमा महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. या महोत्‍सवात ‘भारतीय साधक समाज’चे संस्‍थापक श्री. अनिर्बन नियोगी आणि हिंदु जनजागृती समितीच्‍या बबिता गांगुली यांनी उपस्‍थितांना संबोधित केले.

श्री. अनिर्बन नियोगी

बबिता गांगुली

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने बिहार, झारखंड आणि बंगाल या राज्‍यांत विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्‍सव साजरा करण्‍यात आला. याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.

बिहार

श्री. चैतन्‍य तागडे

पाटलीपुत्र येथील गुरुपौर्णिमेला समाजातून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

पाटलीपुत्र – येथील चित्रगुप्‍त समाजाच्‍या सभागृहामध्‍ये गुरुपौर्णिमा आयोजित करण्‍यात आली. या वेळी सनातन संस्‍थेचे श्री. चैतन्‍य तागडे यांनी उपस्‍थितांना संबोधित केले. या महोत्‍सवाला १०० हून अधिक जिज्ञासू उपस्‍थित होते.

क्षणचित्रे

१. पाटलीपुत्र येथील मित्र मंडळ कॉलनीत ६२ सदनिका आहेत. या कॉलनीच्‍या सचिवांनी गुरुपौर्णिमा महोत्‍सवाची निमंत्रणपत्रिका पाहिली आणि ती सर्व सदनिकांमध्‍ये देण्‍यास सांगितली.

२. गुरुपौर्णिमेचा प्रसार चालू असतांना समाजातील एका महिलेला समितीचे कार्य इतके आवडले की, ती साधकांसह निमंत्रण देण्‍याच्‍या सेवेत सहभागी झाली.

३. ध्‍वनीक्षेपकाच्‍या माध्‍यमातून प्रसार चालू असतांना मिळालेले पत्रक पाहून एका जिज्ञासूने स्‍वत:हून संपर्क साधला.

मुझफ्‍फरपूर आणि समस्‍तीपूर येथील गुरुपौर्णिमा महोत्‍सवाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

गुरुपौर्णिमा महोत्‍सवाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

मुझफ्‍फरपूर – येथील ‘चेंबर ऑफ कॉमर्स’मध्‍ये गुरुपौर्णिमा महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. या वेळी सनातन संस्‍थेच्‍या मनीषा मिश्री यांनी उपस्‍थितांना संबोधित केले. या गुरुपौर्णिमेचा ११५ हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

समस्‍तीपूर – येथील खाटू श्‍याम मंदिरात गुरुपौर्णिमा महोत्‍सव आयोजित करण्‍यात आला. येथे सनातन संस्‍थेच्‍या सौ. सानिका सिंह यांनी उपस्‍थितांना संबोधित केले. या कार्यक्रमाला १२० हून अधिक भाविक उपस्‍थित होते.

क्षणचित्र

समस्‍तीपूर येथे गुरुपौर्णिमा महोत्‍सव चालू असतांना एक धर्मप्रेमी त्‍यांच्‍या सहकार्‍यांसह लग्‍नासाठी सभागृहाची नोंदणी करण्‍यासाठी आले होते. त्‍यांना गुरुपौर्णिमेचा विषय पुष्‍कळ आवडला. ते म्‍हणाले, ‘‘मी माझ्‍या लग्‍नासाठी सभागृह बघायला आलो होतो; पण तुमचा विषय मला पुष्‍कळ आवडला. त्‍यामुळे मी येथे ऐकायला बसलो. मला माझ्‍या लग्‍नात अशाच प्रकारचे प्रवचन आयोजित करायचे आहे.’’ या वेळी त्‍यांनी काही ग्रंथ खरेदी केले.

 धनबाद (झारखंड)

डॉ. नील माधव दास

धनबादमधील राजकमल सरस्‍वती विद्या मंदिर येथे गुरुपौर्णिमा महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. या वेळी ‘तरुण हिंदू’चे संस्‍थापक डॉ. नील माधव दास आणि हिंदु जनजागृती समितीच्‍या कु. कनक भारद्वाज यांनी उपस्‍थितांना संबोधित केले.

कु. कनक भारद्वाज

 कतरास (झारखंड)

पू. प्रदीप खेमका

कतरासमधील खेमका भवन येथे गुरुपौर्णिमा आयोजित करण्‍यात आली होती. या गुरुपौर्णिमेमध्‍ये कोलकाता येथील शास्‍त्र धर्म प्रचार सभेचे सहसचिव तथा ‘ट्रूथ’ साप्‍ताहिकाचे संपादक पू. डॉ. शिवनारायण सेन आणि सनातनचे पू. प्रदीप खेमका यांनी मार्गदर्शन केले.

पू. डॉ. शिवनारायण सेन

या कार्यक्रमाला सनातनच्‍या पू. (सौ.) सुनीता खेमका यांची वंदनीय उपस्‍थिती होती.

 रांची (झारखंड)

श्री. शंभू गवारे

रांचीमधील माहेश्‍वरी भवनामध्‍ये गुरुपौर्णिमा महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले. या वेळी विश्‍व हिंंदु परिषद, झारखंडचे अध्‍यक्षश्री. चंद्रकांत रायपत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शंभू गवारे यांनी उपस्‍थितांना मार्गदर्शन केले.