पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात राबवण्यात आलेले ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ !

साधकांच्या व्यष्टी साधनेत सातत्य ठेवण्याविषयी केलेले मार्गदर्शन आणि सर्वांमध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी पू. रमानंद गौडा यांनी केलेले प्रयत्न यांविषयी जाणून घेऊया.

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी सनातनचे ७५ वे समष्टी संत पू. रमानंद गौडा (वय ४५ वर्षे) यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात राबवण्यात आलेले ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ !

या लेखात पू. रमानंद गौडा यांनी ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ यशस्वी होण्यासाठी प्रत्येक टप्प्यातील सेवांचे चिंतन कसे करायचे ?’, याविषयी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.

शुद्ध अंतःकरणाने केलेली सेवा गुरुचरणी समर्पित होते ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, कर्नाटक राज्य

‘निर्मळ मनात भगवंत वास करतो. अंतःकरणात असलेले आपले दोष आणि अहं नष्ट झाल्यास आपले मन शुद्ध होते. त्या वेळी आपण कुठेही असलो, तरी ते गुरुदेवांना दिसते. शुद्ध अंतःकरणाने केलेली सेवा गुरुचरणी समर्पित होते’, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केले. 

समाजाच्या प्रत्येक घटकासाठी आवश्यक अशा सनातनच्या सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदेचा लाभ घ्या ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

सनातन संस्थेने अध्यात्मशास्त्र, धर्माचरण, दैनंदिन आचरणाशी संबंधित कृती, भारतीय संस्कृती आदी अनेक विषयांवर अनमोल आणि सर्वांगस्पर्शी ग्रंथ प्रकाशित केले आहेत. सनातनच्या ग्रंथांचे दिव्य ज्ञान समाजापर्यंत पोचवण्यासाठी संस्थेच्या वतीने संपूर्ण भारतात ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ चालवण्यात येत आहे.

सनातनच्या ग्रंथांचा लाभ घेऊन नागरिक चांगले भवितव्य घडवू शकतात ! – ग्लेन टिकलो, आमदार, भाजप, गोवा

गोव्यात सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’स उत्तम प्रतिसाद

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी सनातनचे संत पू. रमानंद गौडा यांनी राबवण्यात आलेले ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ !

‘पू. रमानंद गौडा यांना सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियानाची संकल्पना कशी सुचली ? त्यांनी तळमळीने आणि परिश्रम घेऊन या अभियानाचे सुनियोजन कसे केले अन् त्यातून आम्हाला कोणती सूत्रे शिकायला मिळाली ?’, हे पुढे दिले आहे.

सनातन करत असलेले कार्य उत्तम ! – श्रीकृष्णनंद गुरुजी, दत्तसेवाश्रम, दावणगेरे, कर्नाटक

मी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचा वर्गणीदार असून नियतकालिकातही पुष्कळ चांगले विषय असतात. हे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोचायला हवे. तुम्ही करत असलेले कार्य उत्तम आहे. तुम्ही हे कार्य पुढे चालवा, असा आशीर्वाद दावणगेरे येथील दत्त सेवाश्रमाचे श्रीकृष्णनंद गुरुजी यांनी सनातनच्या साधकांना दिला.

गुरूंच्या आशीर्वादाचे फलित !

सर्व ग्रंथांचे वैशिष्ट्य म्हणजे यांतील ५० टक्के लिखाण हे इतरांचे लेख, साधकांना मिळालेले ईश्वरी ज्ञान इत्यादींच्या माध्यमातून गोळा झालेले आहे, तर उरलेले ५० टक्के लिखाण मला प.पू. बाबांच्या आशीर्वादामुळे आतून स्फुरलेले आहे.

रत्नागिरी येथील कै. श्रीकांत पांडुरंग भिडे (वय ६५ वर्षे) यांच्या मित्राने तीर्थक्षेत्री जाऊन केलेले पिंडदान योग्यरित्या झाल्याचे त्यांच्या मुलाला जाणवणे

मी प्रतिवर्षी वडिलांच्या निधनाच्या तिथीला श्राद्धविधी करतो. वडिलांच्या मित्राने त्यांच्यासाठी पिंडदान केल्यावर त्यांचे रखडलेले काम पूर्ण झाल्याने ‘मित्राने केलेले पिंडदान वडिलांपर्यंत पोचले’, असे मला वाटले. त्या संदर्भातील अनुभूती पुढे दिली आहे.