गोव्यात सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’स उत्तम प्रतिसाद

म्हापसा, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा लाभ घेऊन नागरिक चांगले भवितव्य घडवू शकतात. या ग्रंथांचा पंचायत आणि प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमांतून अधिकाधिक प्रसार होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भाजपचे हळदोणा मतदारसंघाचे आमदार ग्लेन टिकलो यांनी केले. सनातनने अध्यात्मशास्त्र, सात्त्विक धर्माचरण, नित्य आचरणाशी संबंधित कृती, भारतीय संस्कृती आदी विषयांवर अनमोल आणि सर्वांगस्पर्शी ग्रंथ प्रकाशित केले आहेत. सनातनच्या ग्रंथांमधील दिव्य ज्ञान समाजापर्यंत पोचण्यासाठी संस्थेच्या वतीने गोव्यासह भारतभर ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सनातनच्या साधकांनी आमदार ग्लेन टिकलो यांची भेट घेऊन त्यांना सनातनच्या ग्रंथसंपदेविषयी सविस्तर माहिती दिली. ही माहिती ऐकल्यानंतर आमदार टिकलो यांनी वरील प्रतिपादन केले.
आमदार ग्लेन टिकलो पुढे म्हणाले,
१. सनातनने ‘नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार’, भावी पिढीला सुसंस्कारित बनवणारे ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी’, ‘दोष घालवा अन् गुण जोपासा’ आदी उपयुक्त ग्रंथ प्रकाशित केले आहेत. मुलांवर चांगले संस्कार करणे, ही आज काळाची आवश्यकता आहे. मुले भ्रमणभाष, माहितीजाल (इंटरनेट) आदींमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे ते चांगल्या शिकवणीपासून दूर रहातात. आजच्या धकाधकीच्या जीवनात नागरिकांना नैतिक मूल्यांचा विसर पडत चालला आहे. सनातनचे हे ग्रंथ वाचल्यास मुलांना चांगला लाभ होऊ शकेल.
२. हे ग्रंथ पुष्कळ कष्ट घेऊन सिद्ध करण्यात आले आहेत. हे ग्रंथ सर्व वाचनालयांमध्ये ठेवता येतील. पंचायत स्तरावर ग्रंथांविषयी जागृती मोहीम राबवता येईल.
३. प्रत्येक नागरिकाने स्वत: थोडा वेळ काढून सनातनच्या ग्रंथांचे वाचन केले पाहिजे, तसेच ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’तही सर्वांनी सहभागी झाले पाहिजे.
४. सर्व वयोगटांतील लोकांसाठी हे ग्रंथ उपयुक्त आहेत.
स्वत:साठी आणि कुटुंबियांसाठी ग्रंथ खरेदी करीन ! – ग्लेन टिकलो
मी स्वत:च्या ज्ञानात भर घालण्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी सनातनचे ग्रंथ खरेदी करणार आहे, असे आमदार टिकलो यांनी सांगितले.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !