पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात राबवण्यात आलेले ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ !

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी सनातनचे ७५ वे समष्टी संत पू. रमानंद गौडा (वय ४५ वर्षे) यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात राबवण्यात आलेले ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…

दैवी आशीर्वाद लाभलेले सनातनचे ग्रंथ

‘गुरुकृपेने सनातनचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत) यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात १.९.२०२१ ते ३१.१०.२०२१ या कालावधीत ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे. मागील लेखात ‘पू. रमानंद गौडा यांनी ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ यशस्वी होण्यासाठी प्रत्येक टप्प्यातील सेवांचे चिंतन कसे करायचे ?’, याविषयी केलेल्या मार्गदर्शनाविषयी जाणून घेतले. या लेखात पू. रमानंद गौडा यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार साधकांनी अभियानासाठी केलेले प्रयत्न, यासमवेत साधकांच्या व्यष्टी साधनेत सातत्य ठेवण्याविषयी केलेले मार्गदर्शन आणि सर्वांमध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी पू. रमानंद गौडा यांनी केलेले प्रयत्न यांविषयी जाणून घेऊया.

(भाग ३)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/519557.html

१. ग्रंथांचे संच बनवणे

१ अ. ग्रंथमालिकेतील विषयानुसार

१. भावी पिढी सुसंस्कारित व्हावी.

२. व्यक्तीमत्त्व विकास आणि तणावमुक्त जीवन, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन

३. आरोग्य आणि आयुर्वेद

४. आपत्काळातील संजीवनी

५. कन्नड, तसेच अन्य भाषांत (मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलगू, मल्याळम, ओडिसा, इंग्रजी इत्यादी भाषांत) उपलब्ध असलेल्या ग्रंथांची सूची आणि काही भाषांतील ग्रंथांचे संच सिद्ध केले.

१ आ. कीमतीनुसार : ‘प्रत्येक व्यक्तीला अत्यावश्यक ग्रंथ मिळायला हवेत’, यासाठी १ सहस्र, २ सहस्र, ३ सहस्र, ५ सहस्र अशा मूल्यांचे संच आणि पूर्ण ग्रंथांचा संच असेही विभाजन केले. ‘या संचांमध्ये कोणते ग्रंथ असायला हवेत ?’, हे ठरवून त्याची एक सूची बनवली.

२. ‘ग्रंथांची मागणी कुणाकडून घेऊ शकतो ?’, याचे चिंतन केले.

३. ‘संपर्क करणार्‍या प्रत्येक साधकाकडे कोणते साहित्य असायला हवे ?’, ते निश्चित केले.

४. आयोजन, प्रसार, प्रसिद्धी आणि ‘सोशल मिडिया’ या सेवांच्या संदर्भात केलेले नियोजन

अ. विषयानुसार ग्रंथांच्या माहितीचे ‘पॉवर पॉईंट’द्वारे (पीपीटीद्वारे माहिती सादर करण्याची एक संगणकीय पद्धत) सादरीकरण (power point presentation) करण्याची सिद्धता केली.

आ. अभियानाची प्रसिद्धी करण्यासाठी आकाशवाणीवरील (रेडिओवर) ‘एफ्.एम्.’ या वाहिनीवर बोलण्यासाठी नियोजन केले.

इ. ‘ट्विटर’, ‘यू ट्यूब’, दूरचित्रवाहिन्या, वृत्तवाहिन्या, ग्रंथांच्या विषयांच्या संदर्भात प्रसिद्धीपत्रक (प्रेस नोट), फलकप्रसिद्धी यांद्वारे अभियानाच्या प्रसिद्धीचे नियोजन केले.

ई. ‘ग्रंथांची उपयुक्तता, महत्त्व आणि ग्रंथ वाचून पालट कसा होतो ?’, याविषयी ‘बाईट्स’ (लहान मुलाखत किंवा एका व्यक्तीने दिलेली माहिती) सिद्ध करण्याचे नियोजन केले. (लहान मुले, हिंदुत्वनिष्ठ, प्रतिष्ठित व्यक्ती, आधुनिक

वैद्य, उद्योजक यांचे ‘बाईट्स’ घेण्याचे नियोजन केले.) त्याप्रमाणे लहान ‘बाईट्स’ सिद्ध करून त्याचा प्रसार करण्याचे निश्चित केले.

उ. काही साधकांचे ‘अभियानाचे महत्त्व सांगणारे’, असे चल्चित्र (व्हिडिओ) सिद्ध करून त्याचा प्रसार करण्याचे नियोजन केले.

५. पू. रमानंद गौडा यांनी एक ‘चिंतन सत्संग’ घेऊन ही सेवा सुनियोजित पद्धतीने होण्यासाठी पुढील दिशा देणे

अ. सर्व सेवांचा आढावा घेण्याची पद्धत ठरवावी.

आ. प्रत्येक दिवशी सेवेतील झालेल्या चुका आणि आलेल्या अडचणी लक्षात येऊन त्यावर उपाययोजना काढाव्यात. त्यामुळे फलनिष्पती वाढून नियोजन चांगल्या प्रकारे होऊ शकते.

६. अभियान राबवतांना व्यष्टी साधना चांगली होण्याच्या दृष्टीने साधकांना करायला सांगितलेले प्रयत्न

अ. साधकांनी स्वतःतील ४ स्वभावदोष आणि २ अहंचे पैलू दूर होण्यासाठी ठरवून प्रयत्न करावा.

आ. साधकांनी ‘तळमळ आणि प्रेमभाव’ हे गुण वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न करावा.

इ. साधकांनी ‘कृतज्ञताभाव आणि समर्पणभाव’ वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न करावा.

७. प्रत्येक साधकात जागृती होण्यासाठी केलेले प्रयत्न

७ अ. पू. रमानंद गौडा यांनी सत्संगात सर्व साधकांना इतरांना ‘ग्रंथ अभियान आणि ग्रंथांचे महत्त्व कसे सांगायला हवे अन् वैयक्तिक स्तरावर कसे ध्येय ठेवू शकतो ?’, यासंदर्भात मार्गदर्शन करणे : प्रत्येक साधकापर्यंत अभियानाचा विषय पोचणे महत्त्वाचे होते. सर्व साधकांसाठी संतांच्या मार्गदर्शनाचे नियोजन केले. या सत्संगात सर्व साधकांना ‘ग्रंथ अभियान आणि ग्रंथांचे महत्त्व इतरांना कसे सांगायला हवे ? आपल्याकडे कोणती माहिती असायला हवी ? आपण कुणाकुणाला संपर्क करू शकतो ? वैयक्तिक स्तरावर कसे ध्येय ठेवू शकतो आणि लेखाच्या (हिशोबाच्या) दृष्टीने कशी काळजी घेऊन ही सेवा करायला हवी ?’, या संदर्भातील विषय घेतला होता.

७ आ. पू. रमानंद गौडा यांनी ‘प्रत्येक साधकाने झोकून देऊन सेवा कशी करावी आणि साधनेच्या दृष्टीने सर्वांनी कसे प्रयत्न करायला हवे ?’, याविषयी मार्गदर्शन करणे : पू. रमानंदअण्णा यांनी ‘प्रत्येक साधकाने झोकून देऊन ही सेवा कशी करावी ? सेवेसाठी अधिक वेळ दिल्यास आणि ही ज्ञानशक्ती घराघरात पोचण्यासाठी तळमळीने अन् भावाच्या स्तरावर प्रयत्न केल्यास साधकांची साधना कशी होणार आहे ? समाजात वावरतांना आपले आचरण कसे असायला हवे ? आपल्यात कोणते गुण असणे आवश्यक आहे ?, तसेच स्वतःच्या व्यष्टी साधनेच्या दृष्टीने सर्वांनी कसे प्रयत्न करायला हवेत ?’, या विषयावर मार्गदर्शन केले.

८. पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण राज्यात ज्ञानशक्ती प्रसार अभियानाचे वातावरण निर्माण होणे आणि सर्व साधकांनी उत्साहाने सेवा चालू करणे

पू. अण्णांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण राज्यात अभियानाचे वातावरण निर्माण झाले. ‘ही सेवा कधी चालू करायची ?’, अशी तळमळ साधकांमध्ये निर्माण झाली आणि सर्वांनी उत्साहाने सेवा चालू केली. पू. रमानंद गौडा यांनी ‘अभियानाची ही सेवा कशी करायची ?’, यासंबंधीची सर्व सिद्धता करून दिल्यामुळे ‘आता केवळ आपल्याला माध्यम बनून सेवा करायची आहे’, असे साधकांना वाटत होते.

९. पू. रमानंद गौडा यांनी प्रतिष्ठितांशी वैयक्तिक संवाद साधणे आणि त्याचा परिणाम

९ अ. पू. रमानंद गौडा यांनी काही धर्मप्रेमी, उद्योगपती, अभियंता (इंजिनीअर), कारखान्याचे मालक यांच्याशी संवाद साधून त्यांना ‘ग्रंथ अभियानात कसे योगदान देऊ शकतो ?’, याविषयी मार्गदर्शन करणे : काही धर्मप्रेमी, उद्योगपती, अभियंता (इंजिनीअर), कारखान्याचे मालक यांच्याशी पू. रमानंद गौडा यांनी अभियानाविषयी चर्चा केली. पू. अण्णांनी त्यांना ‘ग्रंथांचे महत्त्व, ग्रंथात दिलेल्या ज्ञानानुसार आचरण केल्यास काय लाभ होतो ? आपण सर्व जण या अभियानात कसे योगदान देऊ शकतो ?’, याविषयी मार्गदर्शन केले. पू. अण्णांनी त्यांना साधनेच्या दृष्टीने पुढील दिशा दिली.

९ आ. पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनातून सर्वांना प्रेरणा मिळणे : वरील सगळ्यांना ‘संतांचे मार्गदर्शन मिळाले’, त्यामुळे पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि त्यांना प्रेरणाही मिळाली. त्यांनी स्वतःहून चांगल्या व्यक्तींच्या नावांची सूची केली आणि संपर्काचे नियोजन केले. यातूनही चांगला प्रतिसाद मिळाला. हे सर्व जण प्रतिदिन तळमळीने प्रयत्न करत आहेत.

१०. पू. रमानंद गौडा यांनी ठिकठिकाणी जाऊन सर्व साधकांना अभियान सेवेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे

‘कुणीही या सेवेपासून वंचित रहायला नको’, यासाठी अभियान चालू झाल्यानंतर १० दिवसांनी पू. रमानंद गौडा यांनी ठिकठिकाणच्या साधकांना अभियान सेवेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे सर्वांचा ही सेवा करण्यासाठी आत्मविश्वास वाढला.’ (ऑक्टोबर २०२१)

– श्री. काशीनाथ प्रभु (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सौ. मंजुळा रमानंद गौडा (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), श्री. विजय रेवणकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), कर्नाटक