दावणगेरे (कर्नाटक) – मी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचा वर्गणीदार असून नियतकालिकातही पुष्कळ चांगले विषय असतात. हे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोचायला हवे. तुम्ही करत असलेले कार्य उत्तम आहे. तुम्ही हे कार्य पुढे चालवा, असा आशीर्वाद दावणगेरे येथील दत्त सेवाश्रमाचे श्रीकृष्णनंद गुरुजी यांनी सनातनच्या साधकांना दिला. सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रसाराच्या दृष्टीने होत असलेल्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने साधकांनी त्यांची भेट घेतली. श्रीकृष्णनंद गुरुजी यांना सनातनच्या ग्रंथांची माहिती दिल्यावर त्यांना ग्रंथ पुष्कळ आवडले. सनातनच्या चैतन्यदायी ग्रंथांचा लाभ समाजातील अधिकाधिक लोकांना व्हावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने भारतभर ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे.
क्षणचित्रे
१. गुरुजींनी साधकांकडून श्री दत्तगुरु, श्री कालीदेवी आणि अंजनेय स्वामी या देवतांच्या मूर्तींची आरती करून घेतली. तीर्थप्रसाद दिल्यानंतर ‘साधकांची साधना आणि ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ सेवा उत्तम रीतीने होऊ दे’, अशी प्रार्थना करवून घेतली.
२. गुरुजींनी त्यांना भेटायला गेलेल्या साधकांचा दत्तगुरूंसमोर सत्कार केला.