‘अध्यात्मा’सारखा गहन विषय सहजसुलभ भाषेत विवेचन करणारी सनातनची ग्रंथमालिका !
‘सात्त्विक जीवनशैली अंगीकारल्यास मनुष्याचे प्रापंचिक जीवन आनंदमय कसे होऊ शकते’, हे दैनंदिन जीवनातील सोप्या सोप्या उदाहरणांद्वारे सांगणारी, ‘अध्यात्मा’सारखा गहन विषय सहजसुलभ भाषेत उलगडणारी अन् भक्तीयोगाचे रसाळ भाषेत विवेचन करणारी प्रस्तुत ग्रंथमालिका वाचा आणि जीवन आनंदी बनवा !
सुगम सात्त्विक जीवन
(मुलांवर सात्त्विकतेचे संस्कार करणार्या पित्याचे मार्गदर्शन !)
प्रस्तुत ग्रंथात ‘मनाची वैशिष्ट्ये, कामवासनेमुळे होणारी हानी अन् त्या हानीवरील उपाय, शिकण्याच्या स्थितीत राहून गुणसंवर्धन कसे करावे’, यांचे विवेचन केले आहे. ‘कुटुंबातील व्यक्तींची कर्तव्ये कोणती ?त्यांचे आचरण कसे असावे ? मुलांवर संस्कार कसे करावेत ?’ आदींविषयीही मार्गदर्शन केले आहे.
सुगम अध्यात्म
(दैनंदिन जीवनात अध्यात्म कृतीत आणण्यासाठीचे मार्गदर्शन !)
प्रस्तुत ग्रंथात साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, अहंकारामुळे होणारी हानी अन् त्या हानीवरील उपाय, मनुष्याचा मृत्यूकडे पहाण्याचा योग्य दृष्टीकोन आदींचे सविस्तर विवेचन केले आहे. त्याचप्रमाणे साधक, शिष्य, गुरु, संत, राष्ट्रप्रेम इत्यादी विविध विषयांवरील उद्बोधक विचारही दिले आहेत.
सुगम भक्तीयोग
(नामसंकीर्तनयोगाच्या सोप्या विवेचनासह !)
भक्तीमार्ग हा भगवंतप्राप्तीचा अत्यंत सोपा मार्ग आहे. हा मार्ग अनुसरणार्यांसाठी प्रस्तुत ग्रंथात साधना, नामजप आणि उपवास यांविषयी विवेचन केले आहे. ‘भक्त कसा असावा ? ईश्वरावरील श्रद्धा कशी असावी ? साधनेतील प्रगतीची लक्षणे कोणती आहेत ?’ आदींविषयीची माहितीही दिली आहे.
नावांवरून होणार्या कविता
(व्यवहार आणि अध्यात्म यांची शिकवण देणार्या कविता)
या ग्रंथातील कवितांच्या ओळींतील आद्य आणि अंत्य अक्षरांपासून व्यक्तींची नावे सिद्ध होतात. एखाद्याची गुणवैशिष्ट्ये, आदर्श जीवन आदी पैलू या कवितांतून उलगडतात. वाचकही या किंवा यांसारख्या कविता करून त्यांद्वारे इतरांना शुभेच्छा देऊ शकतात. आध्यात्मिक बोधाची देवाणघेवाण शिकवणारा हा ग्रंथ आहे !
सनातनचे ग्रंथांच्या ऑनलाईन’ खरेदीसाठी : SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५२१७