गोवा : सरकारी कर्मचार्यांच्या कुटुंबियांनीच अवैधरित्या घेतला होता गृहआधार योजनेचा लाभ !
सरकारी योजनांचा कुटुंबियांना अवैधरित्या लाभ देणारे सरकारी कर्मचारी समाजद्रोहीच !
सरकारी योजनांचा कुटुंबियांना अवैधरित्या लाभ देणारे सरकारी कर्मचारी समाजद्रोहीच !
कर्लिस उपाहारगृह पाडण्यासाठी आलेला खर्च उपाहारगृहाचा मालक आणि निष्क्रीय संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून वसूल करा !
वर्ष २००५ मध्ये केलेल्या तक्रारीवर वर्ष २०१६ मध्ये निर्णय !,आणि वर्ष २०२२ मध्ये राष्ट्रीय हरित लवाद त्याला मान्यता देत आहे. या कूर्मगतीने चालणार्या प्रशासकीय कारभारातून कधी गैरकारभार किंवा अतिक्रमणे बंद होतील का ?
फाळणी का झाली ? हे समजून घेतले पाहिजे. इतिहास विसरणार्यांना तो इतिहास पुन्हा भोगावा लागतो, असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी केले.
गोव्यातील पोलिसांनी ३ प्रमुख अमली पदार्थ व्यावसायिकांना अटक केली असून यामुळे अमली पदार्थांच्या व्यापाराला आळा बसेल. राज्य सरकारने अमली पदार्थ व्यावसायिकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम चालू केली आहे.
हा कायदा आधीच लागू केला असता, तर अमली पदार्थ व्यवसाय एवढा फोफावला नसता ! प्राण कंठाशी आल्यावर नव्हे, तर आधीच उपाययोजना काढणे अपेक्षित आहे !
हणजुणे येथील वादग्रस्त ‘कर्लिस’ उपाहारगृह पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहे. या उपाहारगृहानजीक काही अंतरावर असलेल्या एका बंद खोलीत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला आहे. यामुळे पुन्हा संशयाचे वादळ घोंगावत आहे.
राष्ट्राची युवा पिढी अशा प्रकारे व्यसने आणि अनैतिकता यांना बळी पडल्यास राष्ट्राचे रक्षण कोण करणार ? त्यामुळे ही केवळ सामाजिक समस्या न रहाता राष्ट्रीय समस्याच असल्याचे जाणून आतापासूनच उपाययोजना करायला हवी !
ही दुकाने अनधिकृत असल्याने सरकारलाही त्यांच्याकडून कर मिळत नसणार. असे असूनही प्रशासन का कारवाई करत नाही ? प्रशासनातील संबंधित विभागांतील अधिकार्यांना या अनधिकृत दुकानांमुळे आर्थिक लाभ होतो का ?
अमली पदार्थ निगडित अन्वेषणासाठी गोवा पोलिसांचे आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचा आरोप भाग्यनगर पोलिसांनी केला आहे. भाग्यनगर पोलिसांचा हा आरोप तथ्यहीन असल्याचे स्पष्टीकरण गोव्याच्या पोलीस महासंचालकांनी दिले आहे.