श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांना अमोनियम बायकार्बोनेट देण्याचा पुणे महापालिकेचा हिंदु धर्मशास्त्रविरोधी निर्णय !

गणेशभक्तांनो, रासायनिक पदार्थ वापरून श्री गणेशमूर्तीचे विघटन करणे, हे देवतेचे विडंबन आहे, हे लक्षात घ्या ! भक्तीभावाने पूजलेल्या श्री गणेशमूर्तीचे रसायनाच्या पाण्यामध्ये विसर्जन न करता धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यातच विसर्जन करा !

भाग्यनगर येथे ४० फूट उंच श्री गणेशाच्या पंचमुखी मूर्तीला १ सहस्र १०० किलो लाडूंचा नैवेद्य !

येथे काही ठिकाणी लाडूंपासून श्री गणेशाच्या मूर्ती बनवण्यात आल्या आहेत.

उत्तरप्रदेश येथून हिंगोली येथे आलेल्या अष्टधातूच्या मूर्तीची स्थापना !

‘शहरात गणेशमूर्ती आल्यानंतर गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी मूर्तीचे विधिवत् पूजन केले आहे. ४ फूट उंचीची असलेली अष्टधातूची मूर्ती ८५ किलो वजनाची आहे. ‘कोविड’च्या सर्व नियमांचे पालन करून शहरात मूर्ती स्थापना केली आहे.

‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत ! – हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर महापालिका आयुक्तांना निवेदन

कृत्रिम हौदात विसर्जित झालेल्या श्री गणेशमूर्ती पुन्हा नदी, समुद्र, तलाव आदी ठिकाणी टाकल्या जातात. यामुळे कृत्रिम हौदासाठी खर्च केलेले सर्व पैसे आणि श्रम पूर्णपणे वाया जाते. काही ठिकाणी तथाकथित पर्यावरणवादी संघटना श्री गणेशमूर्ती जमा करतात आणि त्या मूर्ती पुन्हा गणेश मूर्तिकारांनाच विकतात…

लुधियाना (पंजाब) येथील एका बेकरी व्यावसायिकाने ‘इको फ्रेंडली’ म्हणून बनवली चॉकलेटची श्री गणेशमूर्ती !

गेल्या काही वर्षांपासून ‘इको फ्रेंडली’ सण साजरा करण्याचा प्रघात केवळ हिंदु धर्मासाठीच जाणीवपूर्वक पाडला जात आहे. दुसरीकडे मात्र मोहरम, बकरी ईद आदी सण त्या धर्माच्या परंपरेनुसार पर्यावरणाला लाथाडून साजरे केले जात आहेत.

कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींच्या संदर्भातील ‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या बंदीच्या आदेशाचे ई-कॉमर्स संकेतस्थळांकडून उल्लंघन !

कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीं प्रचंड प्रदूषणकारी आणि पर्यावरणास घातक असल्याने त्यावर बंदी घालण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवाद, पश्‍चिम विभाग, पुणे यांनी ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी दिला होता.

अमरावतीत पावसामुळे मातीच्या मूर्तींची हानी !

शहरात ७ सप्टेंबर या दिवशी पहाटे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे येथील व्यापारी संकुलात पाणी शिरले आहे. यामुळे दुकानात असणार्‍या शाडू मातीच्या श्री गणेशमूर्ती पाण्यात विरघळल्या असून मूर्तीकारांची अनुमाने दीड लाख रुपयांची हानी झाली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘समाजाला देवतांच्या सात्त्विक मूर्तींचा लाभ व्हावा’, याची असलेली तळमळ !

साधकांना श्री गणेशमूर्तीतून अधिकाधिक गणेशतत्त्व मिळावे’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधक-कलाकारांकडून प्रथम धूम्रवर्णाची श्री गणपतीची मूर्ती बनवून घेतली.

‘कागदामुळे पर्यावरणाचा र्‍हास थांबत नसून पर्यावरणाची हानी होते’, हे माहीत नसलेले शिल्पकार !

रसायन तंत्रज्ञान संस्थेने (आय.सी.टी.) केलेल्या शास्त्रीय प्रयोगानुसार १० किलो कागदाची मूर्ती १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित करते.

राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी; मात्र मूर्तींची तपासणी केली जात नाही !

राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी आहे; मात्र अशा मूर्तीं राज्यात नाहीत, असे ठामपणे सांगणे कठीण आहे; कारण गोवा राज्य प्रदूषण मंडळाने राज्यभरातून मूर्तींचे नमुनेच गोळा केलेले नाहीत.