गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे येथून कोकणात जाण्यासाठी ३ विशेष रेल्वे गाड्या

मुंबईवरून जाणार्‍या रेल्वेसाठी आतापर्यंत १ लाख ४ सहस्र गणेशभक्तांची तिकिटांची निश्चिती (कन्फर्म) झाली आहे.  त्या माध्यमातून रेल्वेला ५ कोटी १३ लाख रुपये मिळाले आहेत.

मिरवणुकीची सूचना देऊनही पोलीस भाविकांवर लाठीमार करतात !

कायदा आणि सुव्यवस्थेसाठी नेहमी सहकार्य करणार्‍या हिंदूंवर लाठीमार करणारे पोलीस उत्सवांतील गर्दीचे व्यवस्थापन का करत नाहीत ?

केपे गणेशोत्सव मंडळाच्या सोडत खरेदीसाठी झुंबड

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे व्यावसायीकरण झाले आहे. लोक स्वलाभासाठी सोडत खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

मुंबईत गणेशोत्‍सवात ३ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्‍वनीक्षेपक वापरण्‍यास अनुमती !

यावर्षी गणेशोत्‍सवात केवळ ३ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्‍वनीक्षेपकाचा वापर करण्‍यास जिल्‍हाधिकार्‍यांनी अनुमती दिली आहे. त्‍यामुळे सार्वजनिक गणेशोत्‍सव समन्‍वय समितीने तीव्र अप्रसन्‍नता व्‍यक्‍त केली आहे.

श्री गणेशमूर्ती शास्‍त्रानुसारच हवी !

वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा र्‍हास, ग्‍लोबल वॉर्मिंग (जागतिक तापमान वाढ) आदींमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्‍याचे आव्‍हान आपल्‍यापुढे उभे आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी मनसेची जागर यात्रा !

अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि १५ सहस्र कोटी रुपये खर्चूनही अपूर्ण राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

मुंबई महानगरपालिकेने वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या ९९ मंडळांची अनुमती नाकारली !

रस्‍त्‍यांवर मंडप उभारणी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या ९९ सार्वजनिक मंडळांना मुंबई महापालिकेने अनुमती नाकारली आहे.

विधान परिषदेच्‍या उपसभापतींच्‍या बैठकीला गणेशोत्‍सव मंडळे अनुपस्‍थित !

आगामी गणेशोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर विधान परिषदेच्‍या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी बोलवलेल्‍या बैठकीकडे पुणे शहरातील गणेशोत्‍सव मंडळांनी पाठ फिरवली.

गणेशोत्‍सव, दहीहंडी उत्‍सव शांततेत आणि उत्‍साहात साजरा करा !

गणेशोत्‍सव, दहीहंडी, तसेच अन्‍य आगामी सण- उत्‍सव शांततेत आणि उत्‍साहात साजरे करावेत, त्‍यादृष्‍टीने सर्व संबंधित यंत्रणा अन् मंडळांनी समन्‍वयाने काम करावे, असे आवाहन विधान परिषदेच्‍या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केले.

शिवसेनेकडून कोकणात गणेशोत्सवासाठी विनामूल्य गाड्या सोडण्यात येणार !

कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी शिवसेनेकडून (शिंदे गट) एस्.टी.च्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांचा व्यय शिवसेनेकडून देण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक मतदारसंघातून या बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.