गणेशमूर्ती बनवण्यासाठी शासनाकडून मूर्तीकारांना विनामूल्य शाडूची माती मिळणार ! – मुख्यमंत्री

मुंबई, ३० जून (वार्ता.) – आगामी गणेशोत्सवातील श्री गणेशमूर्ती सिद्ध करण्यासाठी मूर्तीकारांना शासनाकडून विनामूल्य शाडूची माती उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी २९ जून या दिवशी औचित्याचे सूत्र मांडतांना विधानसभेत केली. याला उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या वर्षीही मूर्तीकारांना विनामूल्य शाडूची माती देण्यात आली होती. यंदाच्या गणेशोत्सवात श्री गणेशमूर्ती बनवण्यासाठी शासनाकडून सर्व मूर्तीकारांना विनामूल्य शाडूची माती उपलब्ध करून दिली जाईल. तशा सूचना महापालिका आयुक्तांना देण्यात येतील’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी २९ जून या दिवशी विधानसभेत सांगितले.