Karnataka Controversy Over SchoolGrounds : आदेशामुळे गणेशोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी, हे उत्सव साजरे होऊ शकत नाहीत !

मंगळुरू येथील शाळांची मैदाने अशैक्षणिक कार्यासाठी न देण्याचा कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेषी आदेश

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

मंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने मंगळुरूमधील शाळेची मैदाने आणि इमारती यांचा वापर अशैक्षणिक कारणांसाठी न करण्याविषयीचे परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक दक्षिण कन्नड जिल्हा शालेय शिक्षण संचालकांनी सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांसाठी काढले आहे. यासह शिक्षण विभागाकडे या संदर्भात कोणताही प्रस्ताव संमतीसाठी पाठवू नये, असेही सांगण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक उत्तरदायी असतील. शिक्षण विभागाच्या या आदेशानंतर शाळा व्यवस्थापन मंडळाने गणेशोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी या उत्सवासांठी शाळांची मैदाने उपलब्ध करून देण्याला अनुमती नाकारली आहे.

दक्षिण कन्नड जिल्ह्यातील अनेक सरकारी शाळांच्या मैदानांवर अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होत असल्याचे भाजप आणि हिंदु संघटना यांचे म्हणणे आहे; मात्र या वेळी शिक्षण विभागाने नव्या आदेशाद्वारे गणेशोत्सव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सरकारने हा आदेश तात्काळ मागे घ्यावा’, अशी मागणी बेलथंगडी येथील भाजपचे आमदार हरीश पुंजा यांनी केली आहे.

सामाजिक माध्यमांतूनही या आदेशाला विरोध होत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणुकीच्या वेळी त्यांच्या सभांसाठी याच मैदानांचा वापर केला होता, असेही लोकांचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका

काँग्रेसची राजवट, म्हणजे इस्लामी राजवट ! उत्तरप्रदेशात दुकानाच्या मालकांनी त्यांची नावे लिहिण्याच्या आदेशाला विरोध करणारी काँग्रेस दुसरीकडे हिंदूंची गळचेपी करते, हे लक्षात घ्या !