हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ३३० लोकांचा मृत्यू
भूस्खलनामुळे ९ सहस्र घरांना तडे
१० सहस्र कोटी रुपयांची हानी
भूस्खलनामुळे ९ सहस्र घरांना तडे
१० सहस्र कोटी रुपयांची हानी
गेल्या ४-५ दिवसांपासून पहाडी राज्ये असलेल्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून आणखी २ दिवस मुसळधार पाऊस चालू राहील, अशी चेतावणी हवामान खात्याने दिली आहे.
या पुरात काही घरे वाहून गेली आहेत. यासह रस्ते, पूल, वीजपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधा यांची बरीच हानी झाली आहे.
राज्यातील सध्याची हवामान परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस मुख्यालयाने स्थानिक लोक आणि पर्यटक यांच्या सुरक्षेसाठी सतर्कतेची सूचना जारी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथील पूल अतीवृष्टीमुळे बंद करण्यात आला होता; मात्र आता हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने वाहतूक पूर्ववत् चालू करण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आपत्कालीन पथक, अग्निशमन दलाचे जवान यांनी हे स्थलांतर केले. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी रात्री स्थलांतरितांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने त्यांची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.
दोन दिवस मुसळधार पडलेल्या पावसाने आज विश्रांती घेतल्याने तालुक्यातील चांदेराई, हरचिरी, तोणदे, टेंभ्ये, पोमेंडी, सोमेश्वर आदी भागांतील पुराचे पाणी ओसरल्यामुळे येथील जनजीवन पूर्वपदावर चालू झाले आहे.
नवीन काम करण्यापूर्वी या ‘कॉजवे’ची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती; परंतु मागणीकडे दुर्लक्ष करून त्याच उंचीचा ‘कॉजवे’ बांधला. त्याचा नाहक त्रास आता सर्वांना सहन करावा लागत आहे.
वर्ष २०१९ च्या पावसाळ्यात जुलै आणि ऑगस्ट मासांत कृष्णा खोर्यात अती पर्जन्यमानामुळे पूर परिस्थिती उद्भवली होती. सांगली आणि कोल्हापूर जिल्हे मोठ्या प्रमाणात बाधित झाले. या भागातील पूर नियंत्रणासाठी शासनाने सुचवलेल्या उपाययोजना कामांसाठी जागतिक बँक अर्थसाह्य करणार आहे.