हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे पूरजन्य स्थिती

शिमला – हिमाचल प्रदेशात अतीवृष्टीची चेतातवणी देण्यात आली आहे.  मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेेत. राज्यात पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दरडि कोसळल्या आहेत.

राज्यातील सध्याची हवामान परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस मुख्यालयाने स्थानिक लोक आणि पर्यटक यांच्या सुरक्षेसाठी सतर्कतेची सूचना जारी केली आहे.