पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील १ सहस्र २८ गावे बाधित !

पूरस्थितीमुळे राज्यातील १ सहस्र २८ गावे बाधित झाली असून आतापर्यंत १६४ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. पूरग्रस्त भागातून २ लाख २९ सहस्र ७४ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असून अद्याप १०० लोक बेपत्ता आहेत.

पुष्कळ पाऊस पडल्याने धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करूनही त्याचा परिणाम झाला नाही ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोयना धरणातून पाणी न्यून सोडले; मात्र धरणाच्या बाहेर पुष्कळ प्रमाणात पाऊस पडल्याने धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करूनही त्याचा विशेष परिणाम झाला नाही, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील ११३ जणांचा मृत्यू, १०० जण बेपत्ता, तर १ लाख ३५ सहस्र ३१३ नागरिकांचे स्थलांतर !

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी राज्य सरकारकडून प्रत्येकी २ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित !

आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचच्या माध्यमातून पूरग्रस्तांना साहाय्य !

अंकली, जुनी धामणी, हरिपूर येथील नागरिकांसाठी मालू हायस्कूल, विलिंग्डन कॉलेज याठिकाणी स्थलांतरीत करून ३०० हून अधिक पूरग्रस्तांसाठी भोजनाची सोय करण्यात आली आहे.

नांदेड येथील ८० पैकी २४ महसूल मंडळांत अतीवृष्टी झाल्याने नदी-नाले यांना पूर !

पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा सीमेवरील पुलावरून पाणी वहात असल्याने काही काळासाठी संपर्क तुटला होता. पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे.

कोकणात अतिवृष्टीची शक्यता, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’

कोकणामध्ये पुढील २ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

चिपळूणचा पूर ३६ घंट्यांनंतर ओसरला : १२ जणांचा मृत्यू

व्यापारी आणि नागरिक यांची कोट्यवधी रुपयांची हानी  

सांगली-कोल्हापुरात पाऊस थांबल्याने काहीसा दिलासा : पुराचे सावट कायम

कोल्हापूर अद्यापही संपर्कहीन
सहस्रो एकर शेतीची हानी
४० सहस्रांहून अधिक लोकांचे स्थलांतर

कोल्हापुरात अतीवृष्टीने पूरसदृष्य स्थिती : कोल्हापूर-गगनबावडा, रत्नागिरी महामार्गासह अनेक रस्ते बंद !

कोल्हापुरात अतीवृष्टीने पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. २२ जुलैला सकाळी १० वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ३७ फूट २ इंच इतकी झाली असून २३ जुलैला ही पातळी ४३ फूट गाठण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.

वर्ष २०३० मध्ये चंद्राच्या कक्षेत पालट होऊन पृथ्वीवर पूरस्थिती निर्माण होईल ! – नासा

जागतिक हवामान पालटामुळे पृथ्वीवरील वातावरणावर परिणाम होत आहे. अंटार्टिकामधील बर्फ वितळत आहे. त्यामुळे समुद्रकिनार्‍यालगत शहरांमधील पाण्याची पातळी वाढत आहे.