चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानकडून साहाय्य !

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना १०० चादरी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे यांनी सोलापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सुपुर्द केल्या.

‘मिरज केमिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष विशाल दुर्गाडे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी औषधे अर्पण !

स्वत:च्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूरग्रस्तांना औषधे अर्पण देणार्‍या मिरज केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विशाल दुर्गाडे यांची कृती आदर्शवत् आहे !

कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्ववत्

अतीवृष्टीमुळे पंचगंगा आणि कृष्णा नदी यांना महापूर आला होता. यामुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी रुळाखालील भराव वाहून गेला होता. रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर भराव आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले.

पुरात वाहून गेलेला पूल आणि दुर्घटनेचे उत्तरदायित्व ठरवू न शकलेला आयोग !

रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या घटनेला ५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने…

पूरग्रस्त भागात वीजदेयकांची वसुली नको ! – नितीन राऊत, ऊर्जामंत्री

परिस्थिती निवळल्यावर वीजदेयकात कितपत दिलासा देऊ शकतो, याचा विचार केला जाईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगली येथील पत्रकार परिषदेत दिली.

सरकारने पूरग्रस्तांना तात्काळ साहाय्य घोषित करावे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

जिल्ह्यातील प्रयाग चिखली येथील दौर्‍यावर असतांना ते बोलत होते.

नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

सांगली येथील आयर्विन पुलाची पाणीपातळी २९ जुलै या दिवशी दुपारी २ वाजता ३९ फूट नोंदवण्यात आली. सद्यस्थितीत धरण ८६ टक्के भरले असून धरणातील सध्याचा पाणीसाठा आणि संभाव्य पर्जन्यवृष्टीचा विचार करून धरणाची….

पूरस्थितीनंतर ३२ मार्गांवर वाहतूक चालू !

यामध्ये कोल्हापूर-पुणे मार्गावर सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे, तर ४ दिवसांपासून अडकून पडलेल्या प्रवाशांनाही स्वत:च्या गावी सुखरूप पोचता आले आहे, अशी माहिती एस्.टी.च्या वाहतूक विभागाने दिली.

अनेक भागांत एकाच दिवसात ३२ इंच पाऊस झाल्याने पूर ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

कोल्हापुरात अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन अल्प आकाराच्या मोर्‍या आहेत. बर्‍याचदा गाळ, दगड किंवा झाडे वाहून आल्यामुळे या मोर्‍या बंद होतात.

पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना आता सरपटणारे प्राणी आणि रोगराई यांची भीती !

पावसाचा जोर अल्प झाल्याने राज्यातील ग्रामीण भागात आलेला पूर ओसरला आहे; मात्र आता पूरग्रस्तांसमोर अन्य अनेक समस्या उभ्या आहेत. घरादारांतील चिखल काढत असतांना पूरग्रस्तांसमोर आता पुराच्या पाण्यासमवेत….