आपत्ती व्यवस्थापनाचे तीन तेरा !

नंदुरबार जिल्ह्यात तापी आणि नर्मदा अशा महत्त्वाच्या २ नद्यांना पावसाळ्यात महापूर येतो. त्यामुळे तेथे जीवित आणि वित्त हानी होत असते. त्यामुळे लाखो रुपये व्यय करून खरेदी झालेल्या आपत्ती व्यवस्थापना’च्या साहित्याविषयी प्रशासनाची उदासीनता जनतेच्या मुळावरच उठणारी आहे.

पूर व्यवस्थापनाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

भविष्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास कोणतीही अडचण भासू नये, यादृष्टीने पूर व्यवस्थापनासाठी सर्व विभागांना आवश्यक साधनसामग्री आणि उपाययोजना यांचा समावेश असणारा जिल्ह्याचा एकत्रित परिपूर्ण प्रस्ताव राज्यशासनाकडे सादर करावा,.

देशातील २५ राज्यांत पावसामुळे २१८ जणांचे बळी : सर्वत्र जनजीवन विस्कळीत

महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांत पूरस्थिती आणि दरड कोसळणे यांमुळे २१८ जण मृत्यूमुखी पडले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांसह देशातील २५ राज्यांत मुसळधार पाऊस पडत आहे.

नाशिक-गुजरात सीमेवरील दमणगंगा नदीला पूर !

मागील काही दिवसांपासून मुसळधार बरसणार्‍या पावसामुळे नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. गंगापूर, कश्यपी धरणातील पाणीसाठा वाढला आहे, तर त्र्यंबकेश्वर, हरसूल, सुरगाणा आदी भागांत रस्ते खचले असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत.

पहिले पाढे पंचावन्न !

‘आगामी काळात त्यांचे तांडव पहायला मिळू शकते’, असे अनेक संतांनी सांगितले आहे. त्याचे रौद्ररूप पहाण्याची वेळ ओढवून घेण्यापेक्षा वेळीच जागे होण्यातच शहाणपण आहे. निसर्गरक्षणाचा संकल्प करून कृती केली, तर निसर्गदेवही आशीर्वाद दिल्याविना रहाणार नाही !

गडचिरोली जिल्ह्यात ट्रक वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू !

जिल्ह्यातील आलापल्लीवरून भामरागडला जातांना एक ट्रक ९ जुलै या दिवशी पुराच्या पाण्यात वाहून गेला. ट्रकमधून प्रवास करणार्‍या तिघांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत.

मराठवाड्यात ढगफुटीसदृश पाऊस !

जिल्ह्यासह मराठवाड्यात ८ जुलैपासून मुसळधार पाऊस चालू आहे, तर काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. पावसामुळे सहस्रो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.

अमरनाथ गुंफेजवळ आलेल्या पुरामुळे १६ जणांचा मृत्यू, तर ४० जण बेपत्ता

या पावसात या तळावरील काही तंबू, प्रसादालय आदींची हानी झाली. येथे बचावकार्य चालू आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती  निवारण दल, पोलीस आणि नागरी प्रशासन यांचे अधिकारी अन् कर्मचारी यात सहभागी झाले आहेत

सिंधुदुर्गात धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क रहाण्याचे आवाहन !

पावसाचा जोर पहाता धरणांच्या पाणलोट क्षेत्रामधून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पुढील १-२ दिवसांत सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरून पूर्ण संचय पातळीवरील अतिरिक्त पाणी धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात ओसंडून वहाणार आहे.

चांदूरबाजार (जिल्हा अमरावती) शहराच्या वस्तीत आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत !

४ जुलैच्या मध्यरात्रीपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील चांदूरबाजार शहरासह तालुक्यातील आसपासच्या गावांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्धवट असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ वरील पूल वाहून गेला आहे.