आसाम आणि मेघालय राज्यांत पूरस्थिती : १६ जणांचा मृत्यू

नवी देहली – मुसळधार पावसामुळे देशातील आसाम आणि मेघालय राज्यांतील १ सहस्र ७०० गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. धारवाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सरकारी शाळेची बस पाण्यात अडकली. बसमध्ये अनुमाने १५० विद्यार्थी होते. शिक्षक आणि स्थानिक लोकांच्या साहाय्याने सर्व विद्यार्थ्यांना बसमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

मेघालयातील सोहरा (चेरापुंजी) येथे १७ जून या दिवशी वर्ष १९९५ नंतरच्या सर्वाधिक पावसाचा नवा विक्रम आहे. गेल्या १२२ वर्षांत ३ वेळा एवढा पाऊस पडला आहे.