आसाममधील सिलचर येथील बंधारा तोडणार्‍या दोघा मुसलमानांना अटक

  • मुसलमानांचा नवीन प्रकारचा जिहाद जाणा !

  • बंधारा तोडल्याने आलेल्या पुरामुळे १ लाख लोकांना फटका

सिलचर (आसाम) – बराक नदीवरील बेथुकांदी बंधारा तोडल्यामुळे येथे पूर आला. पोलिसांनी या प्रकरणी मथू हुसेन लस्कर आणि काबूल खान या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात किती जणांचा सहभाग होता, हे अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही.

१. बंधारा तोडला जात असतांनाचे चित्रीकरण करण्यात आले होते. बंधारा तोडण्यात ६ जणांचा समावेश होता. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी या ठिकाणी भेट दिल्यावर ग्रामस्थांनी हा व्हिडिओ त्यांना दाखवल्यावर त्यांनी चौकशीचा आदेश दिला होता. या व्हिडिओमधील ‘आवाज कुणाचा ते ओळखा’, असे आवाहन काबूल खान याने केले होते. हा आवाज काबूल खान याचा असल्याचे अन्वेषणाअंती स्पष्ट झाले.

२. जून मासात मुसळधार पावसाने सिलचरला झोडपले. बंधारा तोडल्यामुळे पावसाचे पाणी शहरात शिरले. १ लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला.

संपादकीय भूमिका

अशा गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी सरकारने न्यायालयाकडे केली पाहिजे !