(म्हणे) ‘रावण आसुरी वृत्तीचा नव्हता, तोही माणूस होता !’

‘आदिपुरुष’ चित्रपटात रावणाची भूमिका करणारे अभिनेते सैफ अली खान यांचा शोध !

  • रावण खलनायक आणि राक्षस होता, हे जगजाहीर असतांना अशा प्रकारचे त्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न चित्रपटातून होत असेल, तर आताच हिंदूंनी या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवून तो रहित करण्यास निर्मात्यांना भाग पाडले पाहिजे !
  • सैफ अली खान उद्या गझनी, महंमद घोरी, अकबर, औरंगजेब, तैमुरलंग, चेंगिझ खान आदींनाही खलनायक नव्हे, तर माणूस ठरवण्याचा प्रयत्न करतील, हे लक्षात घ्या !
अभिनेता सैफ अली खान

मुंबई – रावणाला आजवर आपण केवळ खलनायकाच्या भूमिकेत पाहिले आहे; पण तो खलनायक नव्हता. तोही एक माणूस होता. रावण माणूस म्हणून कसा होता ? याचे चित्रण ‘आदिपुरुष’ चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पहायला मिळेल, अशी माहिती अभिनेता सैफ अली खान यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे. रावणाला चांगले दाखवण्याच्या या प्रयत्नावर सैफ अली खान यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका होऊ लागली आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपट वर्ष २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. तो रामायणावर आधारित आहे. यात सैफ अली खान यांनी रावणाची भूमिका साकारली आहे.

सैफ अली खान यांनी पुढे म्हटले की, रावणाने भगवान श्रीराम यांच्याशी युद्ध केले हे सर्वांनाच ठाऊक आहे; पण त्यालाही एक पार्श्‍वभूमी होती. श्रीरामाचे भाऊ लक्ष्मण यांनी शूर्पणखेचे नाक कापले होते. त्यानंतर हे युद्ध होणारच होते. या चित्रपटात रावणाची विचारसरणी काय होती, हे दाखवले जाणार आहे.