हत्तींपासून गावाचे रक्षण करू न शकणारे पोलीस आणि सरकार !

दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील मोर्ले गावात ४ हत्तींच्या कळपाने केळी, सुपारी आणि नारळ यांच्या बागायतींसह शेतीसाठीच्या पाण्याची जलवाहिनी, तसेच कुंपण उद्ध्वस्त केले.

कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतर कायम रहाणार !

देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याची उपलब्धता आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातबंदीचा हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील, असे केंद्राने नवीन परिपत्रकात म्हटले आहे.

Elephant Attack : सिंधुदुर्ग – मोर्ले गावात हत्तींकडून शेती आणि बागायती यांची मोठी हानी !

हत्तींचे भांडण आणि त्यांचा मोठ्या आवाजातील चित्कार यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण  पसरले होते. मोर्लेतील २ सहस्र केळी, २०० हून अधिक सुपारीची झाडे आणि ५० हून अधिक माड भूईसपाट केले.

राज्यातील शेतकर्यांच्या १ लाख ६० सहस्र रुपयांपर्यंतच्या कर्जाचे मुद्रांक शुल्क माफ होणार !

सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे रहाणारे आहे. डिजिटल क्रांतीचा वापर शेतकर्‍यांसाठी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या डिजिटल प्रकल्पामुळे शेतकर्‍यांच्या जीवनात क्रांती येणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे या वेळी म्हणाले.

देहलीत चालू असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन कि षड्यंत्र ?

केंद्र सरकारने या आंदोलनाची तात्काळ नोंद घेऊन केंद्रीय मंत्र्यांना चर्चेसाठी पाठवले; परंतु सर्व चर्चा निष्फळ ठरल्या. या आंदोलकांना कुठलाच प्रस्ताव मान्य नसेल, तर देशात अराजकता निर्माण करण्याचाच हेतू या आंदोलनामागे नसेल कशावरून ?

शेतकर्‍यांच्या मागण्यांविषयी कार्यवाहीही चालू झाली आहे ! – पालकमंत्री दादा भुसे

शेतकर्‍यांच्या नाशिक पातळीवरील ज्या समस्या आहेत. त्यांच्या मागण्यांविषयी अतिशय जलद गतीने चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची कार्यवाहीही चालू झालेली आहे, असे वक्तव्य नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकर्‍यांना दिले.

गारपिटीने झालेल्या हानीचे तात्काळ पंचनामे केले जातील !

‘महाराष्ट्रातील ५ ते ६ जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊन पिकांची हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, ही स्थिती खरी आहे. त्या हानीचे तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश दिले आहेत.

संपादकीय : पुन्हा ‘किसान आंदोलन !’

किसान आंदोलनाचे स्वरूप केवळ सरकारविरोधी न रहाता ते देशविरोधी होत जाते, हे धोकादायक !

सहस्रो शेतकर्‍यांना फसवणार्‍या जग्गू डॉन प्रकरणी ८२ लाखांचा माल जप्त

मलकापूर येथील जगन रामचंद्र नारखेडे ऊर्फ जग्गू डॉन आणि त्याच्या साथीदारांनी ७ सहस्र ५०० रुपये बाजारभाव असतांना शेतकर्‍यांकडून ९ सहस्र रुपये क्विंटल भावाने कापूस खरेदी केली. त्याने सहस्रो शेतकर्‍यांना फसवले.

रत्नागिरीत १३ फेब्रुवारीला फळ प्रक्रिया क्षेत्रातील उद्योजकांसाठी स्नेहमेळावा

फळपिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग, त्यांची सद्य:स्थिती आणि आव्हाने यावर गोखले इन्स्टिट्यूटच्या वतीने अभ्यास केला जात आहे.