बोगस बियाणाच्या विरोधात ‘व्हॉट्सॲप’वरून तक्रार प्रविष्ट करता येणार ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

बोगस आणि चढ्या दराने बियाण्यांची विक्री केल्यास, तसेच खरेदीची अनावश्यक सक्ती केल्यास त्या विरोधात कृषी तक्रार व्हॉट्सॲप हेल्पलाईनच्या ९८२२४४६६५५ या क्रमांकावर तक्रार करता येणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

पिंपळखुंटा (छत्रपती संभाजीनगर) येथे बँकेने कर्ज न दिल्याने शेतकर्‍याची आत्महत्या !

बँकेच्या शाखाधिकार्‍यांनी त्यांच्या खात्यावर पैसे ठेवण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या नैराश्यातून दाभाडे यांनी आत्महत्या केली.

रत्नागिरी येथील सनातनचे साधक प्रमोद भडकमकर एस्.आर्.टी. कृषी सन्मान विशेष पुरस्काराने सन्मानित

मागील १० वर्षे सातत्याने एस्.आर्.टी. पद्धतीने भडकमकर कुटुंबीय लागवड करतात. भातासह नाचणी, वरी, पावटे, कुळीथ आदी पिके ते घेत आहेत. या पद्धतीमुळे जमिनीची धूप थांबते आणि सुपीकताही वाढते.

शेतमाल चोरणार्‍यांवर कारवाई करा ! – शेतकरी संघटनेची पोलीस महानिरीक्षकांकडे मागणी

राज्यात प्रचंड दुष्काळ आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतीमालाला भाव नाही. अनंत अडचणींचा सामना करून कर्ज काढून शेतकरी शेतीमाल पिकवतात.

Goa Padmashri Award : सावईवेरे (गोवा) येथील शेतकरी संजय पाटील यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ प्रदान !

श्री. संजय पाटील यांना यापूर्वी ‘गोवा कृषी रत्न’ पुरस्कार, ‘गोवा बागायतदार’चा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार, ‘ईकार- भारतीय कृषी संशोधन संस्थेचा ‘इ.ए.आय्.आर्.’ नावीन्यपूर्णता असलेला शेतकरी पुरस्कार आणि ‘गोवा राज्य जैवविविधता मंडळा’चा पुरस्कार मिळालेला आहे !

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; मात्र मोठे निर्यात शुल्क लागू केल्याने शेतकरी अप्रसन्न !  

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे; मात्र दुसर्‍या बाजूला ५५० डॉलर प्रतिमेट्रिक टन किमान निर्यात शुल्क लागू करण्यात आले आहे, त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये अप्रसन्नता आहे.

गुप्त धन सापडल्याचा बनाव करून खोटे सोने विकणार्‍या मुसलमानाला अटक !

विविध क्लृप्त्या काढून जनतेला फसवणारे धर्मांध गुन्हेगार !

बोगस बियाणे खते आढळल्यास गुन्हे नोंदवा ! – जिल्हाधिकारी

बोगस बियाणे आणि खते निदर्शनास आल्यास तातडीने गुन्हे नोंद करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या. जिल्हा खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.

अमरावती जिल्ह्यात अवेळी पावसामुळे ५५ सहस्रांहून अधिक हेक्टरची हानी !

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत अवकाळी पावसाने सलग चौथ्या दिवशी उपस्थिती लावली आहे. भर उन्हाळ्यात सलग कोसळणारा अवेळी पाऊस आणि गारपिटी यांनी अक्षरक्ष: शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पुणे जिल्ह्यांतील ‘उजनी धरणा’तील गाळ काढावा !

उजनी धरणातून गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याचा निर्णय हा सरकारी कागदपत्रांमध्ये अडकला असून दिवसेंदिवस धरणाच्या गाळ्यात वाढ होऊन पाणीसाठा अल्प होत आहे.