बुलढाणा – मलकापूर येथील जगन रामचंद्र नारखेडे ऊर्फ जग्गू डॉन आणि त्याच्या साथीदारांनी ७ सहस्र ५०० रुपये बाजारभाव असतांना शेतकर्यांकडून ९ सहस्र रुपये क्विंटल भावाने कापूस खरेदी केली. त्याने सहस्रो शेतकर्यांना फसवले. ३० नोव्हेंबर २०२३ या दिवशी अतुल पाटील यांनी तक्रार दिल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. कोट्यवधी रुपये किमतीची मालमत्ता खरेदी आणि गुंतवणूक केली. या प्रकरणी आजअखेर ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २० लाखांच्या नकली नोटा छापण्याची ३ यंत्रे, ४१ लाखांच्या २ महागड्या चारचाकी, १९ लाख रुपये रोख याचा यात समावेश आहे.
जग्गू याने शेतकर्यांची फसवणूक करून मिळालेल्या पैशांतून मोठ्या प्रमाणात विविध मालमत्ता खरेदी केल्या होत्या.