सतत पडणार्‍या पावसामुळे शेतकर्‍यांची हानी : हानीभरपाई द्यावी, अशी शासनाकडे मागणी

अवेळी पडत असलेल्या पावसामुळे भात पिकासह अन्य पिकांचीही हानी होत आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकर्‍यांना हानीभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण !

सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी ३ दिवसांपासून चालू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला १९ नोव्हेंबर या दिवशी हिंसक वळण लागले.

शेतकरी हित कि अहित ?

‘जनतेला काय आवडते ? यापेक्षा जनतेच्या जे हिताचे आहे’, त्यानुसार निर्णय घेण्यात शासनकर्त्यांची खरी कसोटी आहे. जे योग्य आहे, त्याला शेवटपर्यंत धरून रहाणे आणि ज्यांना समजत नाही, त्यांना समजावून सांगणे हे कौशल्यच आहे.

(म्हणे) ‘महाराष्ट्र, बंगाल आणि केरळ सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न !’ – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

‘शेती हा देहलीचा नव्हे, तर राज्याचा विषय आहे. आम्ही कृषी विद्यापिठांना विचारून निर्णय घेत होतो’, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

शेतकरी आंदोलनाचा भारतीय सैन्यावर परिणाम ! – मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक

सैन्याच्या २ जनरलनी सांगितले की, शेतकरी आंदोलन भारतीय सैन्यदलांवरही परिणाम करत आहे. त्यामुळे काहीही होऊ शकते. आज तुम्ही सत्तेच्या खुर्चीवर आहात आणि अहंकारात काहीही करत आहात; मात्र याचे काय पडसाद उमटतील, हे तुम्हाला ठाऊक नाही.

हिसार (हरियाणा) येथे भाजपच्या खासदाराच्या गाडीवर शेतकरी आंदोलकांचे आक्रमण

हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यामध्ये शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या वेळी भाजपचे राज्यसभेतील खासदार रामचंदर जांगरा यांच्या गाडीवर आक्रमण करण्यात आले. या वेळी त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या.

तिलारी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी येत नसल्याने शेती आणि बागायती यांची हानी

तिलारी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही उजव्या कालव्यात पाणी आलेले नाही. त्यामुळे घोटगेवाडी, परमे येथील शेतकर्‍यांच्या केळीच्या बागा पाण्याच्या अभावी करपून जात आहेत.

देहली येथील सीमेवरील शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी एका तरुणाची अमानुष हत्या !

कुराण, श्री गुरु ग्रंथ साहिब आदींचा अवमान झाल्यावर थेट कायदा हातात घेतला जातो, तर हिंदूंच्या धर्मग्रंथांचा, देवतांचा अवमान होऊनही सारे कसे शांत असते ! हिंदूंनी वैध मार्गाने जरी विरोध करण्याचा प्रयत्न केला, तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हा विरोध दाबला जातो !

काँग्रेसचा शेतकरीविरोधी तोंडवळा !

जर देशात मध्यवर्ती किंवा कुठल्या राज्याच्या निवडणुका असतील, तर काँग्रेसवाल्यांच्या गलिच्छ राजकारणाला कुठलीही सीमा रहात नाही. हेच काँग्रेसवाल्यांचे गलिच्छ राजकारण सध्या उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराच्या प्रकरणाच्या निमित्ताने संपूर्ण देश पहात आहे.

माझा मुलगा हिंसाचाराच्या वेळी घटनास्थळी असल्याचा पुरावा मिळाला, तर मी मंत्रीपदाचे त्यागपत्र देईन ! – केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे आव्हान

लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी भाजपचे स्थानिक खासदार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशीष यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे