दौंड (पुणे) येथे कसायाला गाय विकणार्‍या शेतकर्‍याकडून ती विकत घेऊन युवकांनी गायीचे प्राण वाचवले !

गायीचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी केलेली कृती अभिनंदनीय आणि अनुकरणीय !

मोठ्या प्रमाणात लागवड करू इच्छिणार्‍या शेतकर्‍यांना औषधी वनस्पतींची रोपे उपलब्ध करून देणार !

रोपे मिळवण्यासाठी शेतकर्‍यांनी ‘क्षेत्रीय सहसुविधा केंद्र, पश्‍चिम विभागा’च्या ९०२१०८६१२५ या क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेल वर संपर्क साधावा.

बी-बियाणे देण्यासाठी असलेल्या ‘ऑनलाईन’ नोंदणीची जाचक अट रहित करा ! – संभाजीराव भोकरे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

सध्या ग्रामीण भागात वीज मोठ्या प्रमाणात कधीही जाते. यामुळे ‘सर्व्हर’ वारंवार ‘डाऊन’ होत आहेत, तसेच ‘महा-ई-सेवा केंद्र’, संगणक सुविधा केंद्र बंद आहेत.

मान्सूनपूर्व पावसामुळे विदर्भातील तापमान अल्प; मात्र बियाण्यांच्या अभावी शेतकरी हतबल !

संपूर्ण विदर्भात मान्सूनपूर्व पावसाला आरंभ झाल्याने प्रखर तापमान अल्प झाले. एकीकडे शेतकरी धूळपेरणीची सिद्धता करत आहेत; पण दुसरीकडे बियाण्यांची भाववाढ आणि अल्प साठा यांमुळे शेतकरी हतबल झाला आहे.

अवकाळीच्या वादळी वार्‍यासह झालेल्या मान्सूनमुळे डाळिंब आणि केळीच्या बागा भुईसपाट !

बेदाणा भिजल्याने शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे. त्याचे तातडीने पंचनामे करून त्वरित हानीभरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

वणी (यवतमाळ) तालुक्यात आत्महत्या केलेल्या १२७ शेतकर्‍यांपैकी ३१ शेतकर्‍यांनाच शासकीय साहाय्य !

१२७ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांपैकी १०३ जणांनी विषप्राशन केले, १९ जणांनी गळफास घेतला आणि बाकीच्यांनी पाण्यात बुडून आयुष्य संपवले

यवतमाळ जिल्ह्यात दळणवळण बंदीमुळे शेतकर्‍यांच्या फळबागातील शेतमाल घेण्यास व्यापार्‍यांचा नकार !

कडक निर्बंध आणि राज्यातील दळणवळण बंदी यांमुळे शेतकर्‍यांच्या फळबागातील काढणीस आलेला शेतमाल व्यापारी घेण्यास सिद्ध नसल्याने खराब होत आहे. यातूनच पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव येथील श्रीकृष्ण देशट्टीवार या फळउत्पादक शेतकर्‍याची ४ लक्ष रुपयांची हानी झाली.

रासायनिक खतांची किंमत कमी करा ! – धैर्यशील माने, खासदार, शिवसेना

खतांच्या किंमत ८०० रुपयांनी वाढ झाली आहे. शेतीची कामे जरी चालू असली, तरी बाजारपेठा बंद असल्याने शेतकर्‍यांची परिस्थिती हालाखीची आहे. त्यामुळे रासायनिक खतांची किंमत कमी करावी, अशी मागणी धैर्यशील माने यांनी रासायनिक आणि खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे.

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ सहस्र ३७५ हेक्टर क्षेत्रावरील बागायतीची हानी

१७२ गावांमधील १ सहस्र ५९ शेतकर्‍यांच्या एकूण ३ सहस्र ३७५.१६ हेक्टर क्षेत्रावरील बागेची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हानी झालेल्या पिकांमध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम आणि केळी यांचा समावेश आहे.

४० वर्षांनंतरही तिलारी प्रकल्पबाधित गावांना पाणी नाही ! – सुरेश गावडे, सरपंच, रोणापाल

तिलारी कालव्याचा कारभार पहाता ही योजना तिलारी विभागातील कर्मचारी, अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासाठी आहे कि भूमी दिलेल्या शेतकर्‍यांसाठी आहे ?