दौंड (पुणे) येथे कसायाला गाय विकणार्‍या शेतकर्‍याकडून ती विकत घेऊन युवकांनी गायीचे प्राण वाचवले !

  • गायीचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी केलेली कृती अभिनंदनीय आणि अनुकरणीय !
  • शेतकर्‍यांवर गोवंशिय विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी सरकारने उपाययोजना काढायला हवी !

दौंड (पुणे) – कोलवडी (हवेली) येथील शेतकरी आर्थिक टंचाईमुळे गाय कसायाला विकणार होता. हे समजताच येथील ओंकार गायकवाड, स्वप्निल गायकवाड यांच्यासह ८ तरुणांनी त्या गायीचे मूल्य म्हणजेच १५ सहस्र रुपये शेतकर्‍याला देऊन ती गाय विकत घेतली. त्यांनी ती गाय गोशाळेत पोचवली, तसेच गोशाळेला साहाय्य म्हणून टेम्पो भरून चाराही दिला. बोरमलनाथ गोशाळेच्या वतीने या तरुणांचे आभार मानण्यात आले. तरुणांनी केलेल्या या कार्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.