वर्धा येथे दळणवळण बंदीत वाढ केल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयात फळे आणून टाकली !

कोरोना संकटाच्या काळातील दळणवळण बंदीत वाढ केल्याच्या निषेधार्थ येथील संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयात फळांची रास ओतून संताप व्यक्त केला. ८ ते १३ मेपर्यंत लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांत १८ मेपर्यंत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यावर त्याचे सर्वत्र पडसाद उमटलेे.

ताकतोडा (जिल्हा हिंगोली) येथे पैसा नसल्याने गांजा लागवडीची अनुमती द्यावी !

जिल्ह्यात कोरोनाच्या संकटामुळे बाजारात शेतीमालास भाव मिळत नाही. अवकाळी पावसाने पिकांची हानी झाली आहे. अधिकोष बंद असल्याने पीककर्ज मिळत नाही.

बोगस बियाणांची वाहतूक आणि पुरवठा यांना आळा घाला ! – पालकमंत्री संदिपान भुमरे, यवतमाळ

शेतकर्‍याला उच्च प्रतीचे बियाणे, खते आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे.

अवकाळी पावसाचा सहस्रो शेतकर्‍यांना फटका !

कोरोनाशी दोन हात करतांना या वर्षी सहस्रो शेतकर्‍यांना अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे झालेल्‍या हानीचा मोठा फटका बसला आहे.नुकत्‍याच झालेल्‍या अवकाळी पावसातील गारपीटीमुळे बागायती क्षेत्र आणि फळपिके यांची हानी झाली आहे.आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देहलीच्या सीमेवरील आंदोलक शेतकरी फिरत आहेत माघारी !

देहलीच्या सीमेवर गेल्या ४ मासांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आता येथून निघून जात आहेत. देहलीमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आंदोलक शेतकरी पलायन करत असल्याचे म्हटले जात आहे.

खतांच्या किमती अल्प करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा ! – दादा भुसे, कृषीमंत्री

दरवाढीवरून राजकारण करण्याची ही वेळ नाही.

बिबवणे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील कलिंगड विक्री गाळ्यांना कृषीमंत्री दादाजी भुसे यांची भेट

‘विकेल ते पिकेल’ योजनेची अधिकाधिक व्याप्ती वाढवण्याचे आवाहन भुसे यांनी केले.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता; पिकांच्या हानीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत

गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात तापमान ४३.५ अंशापर्यंत नोंदवले गेले आहे. अकोला जिल्ह्यात तापमान ४२.५ अंश आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिक उकाड्याने त्रस्त्र आहेत.

जलप्रदूषणाचे स्रोत आणि उपाययोजना !

जलप्रदूषण ही गंभीर समस्या गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेली आहे. जलस्रोतांची पडताळणी होतांना जलप्रदूषण करणारे स्रोत शोधून त्यांचा बंदोबस्त केला, तर ही समस्या मुळापासून सुटू शकते.

दळणवळण बंदीमुळे ‘बागेतील केळी विक्रीसाठी कशी काढायची ?’, अशी काळजी वाटणे, त्यातच वार्‍यासह पाऊस पडणे, नामजप अन् प्रार्थना केल्यामुळे केळ्यांच्या सर्व घडांची विक्री होणे

परात्पर गुरु डॉक्टरांंच्या कृपेमुळे दळणवळण बंदी असूनही बागेतील केळी खरेदीला व्यापारी मिळून संपूर्ण बागेतील केळी विकली गेली. ‘ही देवाने दिलेली अनुभूती आहे’, असे माझे पतीही म्हणाले.’