मान्सूनपूर्व पावसामुळे विदर्भातील तापमान अल्प; मात्र बियाण्यांच्या अभावी शेतकरी हतबल !

नागपूर, ७ जून (वार्ता.) – संपूर्ण विदर्भात मान्सूनपूर्व पावसाला आरंभ झाल्याने प्रखर तापमान अल्प झाले. एकीकडे शेतकरी धूळपेरणीची सिद्धता करत आहेत; पण दुसरीकडे बियाण्यांची भाववाढ आणि अल्प साठा यांमुळे शेतकरी हतबल झाला आहे.