चिपळूण येथे मध्यवर्ती बसस्थानकामध्ये उन्हाळा न्यून होईपर्यंत केली थंडगार पाण्याची व्यवस्था

हा  उपक्रम हा पर्यावरणपूरक असून कागदी ग्लासमधून या पाण्याचे वाटप करण्यात येणार आहे, तसेच विद्यार्थीही स्वतःच्या बाटलीमधूनही हे पाणी भरून घेऊ शकतील, अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे.

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात मालवणमध्ये पर्यावरणप्रेमींचे आंदोलन, तर भाजपचे प्रकल्पाला समर्थन !

‘या प्रकल्पामुळे पर्यावरण धोक्यात येणार आहे’, असे सांगत बारसू येथे या प्रकल्पाला विरोध करणार्‍या ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला.

७ सहस्र ५०० झाडांच्या कत्तलीविरोधात तरुणांचे पुणे येथे ‘चिपको’ आंदोलन !

नागरिकांवर आंदोलनाची वेळ येणे दुर्दैवी !

यवतमाळ जिल्ह्यात अवेळी पडलेल्या पावसाने मोठी हानी !

जिल्ह्यात ३ दिवसांपासून चालू असलेल्या वादळी वार्‍यासमवेत गारपीट आणि पाऊस यांमुळे उन्हाळी शेतपिकांची मोठी  हानी झाली आहे. अंदाजे ३ सहस्र हेक्टरवरील उन्हाळी पिके नष्ट झाली आहेत.

खाणींसाठी नव्याने पर्यावरण दाखला घेण्याचा गोवा खंडपिठाचा आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नव्याने पर्यावरण दाखला घेण्यास सांगितले आहे. ‘सोसीयेदाद-द-फॉमेंतो’ यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर गोवा खंडपिठाने हा निर्णय दिला.

पुण्यातील वेताळ टेकडी वाचवण्यासाठी ‘लाँग मार्च’ !

त्या रस्त्याचा १५ टक्केही नागरिक वापर करणार नसल्याचा अहवाल समोर आला आहे; परंतु हा रस्ता करण्यास प्रशासन का हट्ट करत आहे ?

बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या निविदेच्या अटी आणि शर्ती २ सप्ताहांमध्ये निश्चित करू ! – महापालिका प्रशासन

या प्रकल्पामुळे वेताळ टेकडीवरील जैवविविधता धोक्यात येत असल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांनी त्याला विरोध केला आहे. विविध मार्गांनी आंदोलन करत हा प्रकल्प रहित करण्याची मागणीही केली जात आहे.

महाराष्ट्र सरकारकडून ‘विर्डी’ धरणाच्या कामाला पुन्हा प्रारंभ

गोवा सरकारने विर्डी धरणाचे काम त्वरित बंद करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या अनुज्ञप्तींविषयी अन्वेषण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

सोलापूर येथे अनुमतीविना झाडे तोडल्याने अधिकार्‍याला ५ लाख रुपये दंड !

शहरातील नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर असलेली ५ झाडे महापालिकेची अनुमती न घेता तोडल्याविषयी पंढरपूर तालुका क्रीडा अधिकारी सत्तेन जाधव यांना प्रत्येकी १ वृक्ष १ लाख रुपये यानुसार ५ लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे.

गोव्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता

हवामान खात्याने १४ आणि १५ मार्च या दिवशी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या वेळी प्रतिघंटा ३० ते ४० कि.मी. वेगाने वारे वहाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गडगडाट चालू असतांना मोकळ्या जागेत राहू नये, असे हवामान विभागाने म्हटले आहे.