यवतमाळ जिल्ह्यात अवेळी पडलेल्या पावसाने मोठी हानी !

  • ३ सहस्र हेक्टरवरील उन्हाळी पिके नष्ट   

  • ३०६ घरांची पडझड, ४८ गुरे मृत्यूमुखी

( संग्रहीत छायाचित्र )

यवतमाळ, २९ एप्रिल (वार्ता.) – जिल्ह्यात ३ दिवसांपासून चालू असलेल्या वादळी वार्‍यासमवेत गारपीट आणि पाऊस यांमुळे उन्हाळी शेतपिकांची मोठी  हानी झाली आहे. अंदाजे ३ सहस्र हेक्टरवरील उन्हाळी पिके नष्ट झाली आहेत. यात ३०६ घरांची पडझड झाली असून ४८ गुरे मृत्युमुखी पडली आहेत. जिल्ह्यातील यवतमाळ, महागाव, दिग्रस, पुसद, उमरखेड, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव तालुक्यांत ही हानी झाली आहे. आणखी ३ दिवस धोक्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.