मानवी जीवन वाचवण्‍यासाठी पृथ्‍वीचे संरक्षण आवश्‍यक !

आज नैसर्गिक साधनसंपत्तीच्‍या संवर्धनाकडे विशेष लक्ष देण्‍याची आवश्‍यकता आहे. ज्‍यात प्रामुख्‍याने सूर्यप्रकाश, खनिजे, वनस्‍पती, हवा, पाणी, वातावरण, भूमी आणि प्राणी इत्‍यादींचा समावेश होतो. या संसाधनांचा बिनदिक्‍कतपणे दुरुपयोग होत आहे.

गोवा : ३ दिवसांच्या पर्यावरण चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

गोवा मनोरंजन संस्थेच्या परिसरात दिसणारे लोगो प्लास्टिक कचर्‍याच्या वापरावर लक्ष केंद्रित करण्याच्या कल्पनेने विकसित केले गेले आहेत आणि यामुळे लोकांना प्लास्टिक कचर्‍याचा चांगल्या प्रकारे वापर आपल्या दैनंदिन जीवनात कसा करू शकतो, याची प्रेरणा मिळते.

‘ॲक्टिव्ह ग्रुप’ चिपळूण आयोजित चर्चासत्रात तालुका पर्यटन चळवळीस उभारी देण्याचा निर्धार !

आगामी काळात शहराला उपलब्ध होणारे रस्ते आणि अन्य सुविधांच्या पार्श्वभूमीवर हेरीटेज अन् सह्याद्रीतील आजूबाजूच्या भटकंतीसाठी ‘चिपळूण’ प्रसिद्ध आणि विकसित करायला हवे.

गोवा राज्यातील महत्त्वाच्या धरणांतील पाण्याची पातळी घटल्याने पाणीटंचाईचे सावट !

राज्यातील महत्त्वाच्या ६ पैकी ३ धरणांची पाण्याची पातळी पुष्कळ खालावल्याने आणि पावसाचे आगमन उशिरा होण्याची चिन्हे असल्याने पाण्याच्या दुर्भिक्षाचे सावट राज्यावर पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

परशुराम घाटातील महामार्गाची एक दुपदरी मार्गिका ३१ मेपर्यंत चालू होणार !

येत्या पावसाळ्यात परशुराम घाटात वाहतूककोंडी होणार नसल्याचे सांगितले जात आहे. मागील २ वर्षे पावसाळ्यात हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक ठरला होता.

मुंबईमध्ये घरगुती गणेशमूर्ती शाडूच्या मातीच्याच !

शाडूची माती ही नैसर्गिक असल्यामुळे त्यापासून सिद्ध केलेल्या मूर्तीमुळे कोणत्याही प्रकारे प्रदूषण होत नाही. याउलट कागदी लगद्यापासून सिद्ध केलेल्या मूर्तीमुळे प्रदूषण होते. त्यामुळे शाडूच्या मातीची गणेशमूर्ती पर्यावरणपूरक आहेत.

गोव्यात यंदा ८ जूनला पाऊस : वेधशाळेचा अंदाज

नैऋत्य पाऊस भारतीय उपखंडात ४ जून या दिवशी पोचणार आहे. पाऊस ४ जूनला केरळ किनारपट्टीला धडक देणार आहे, तर ८ ते ९ जूनपर्यंत पाऊस गोव्यात पोचणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

यंदा गणेशोत्सवासाठी गोव्यात पर्यावरणपूरक आणि सात्त्विक श्री गणेशमूर्ती उपलब्ध

श्री गणेश कला केंद्र, पुणे वर्ष २००७ पासून शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेल्या, पर्यावरणपूरक आणि सात्त्विक श्री गणेशमूर्तींचे उत्पादन करण्यात अग्रेसर आहे. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे त्या १०० टक्के पर्यावरणपूरक आहेत.

नदी स्वच्छ, प्रदूषणमुक्त करण्यासाठी दूषित पाणी नदीमध्ये जाऊ न देणे आवश्यक ! – डॉ. सुरेश खाडे, पालकमंत्री, सांगली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत कृष्णा नदीच्या तीरावर झालेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

प्रकल्पावरून माघार न घेतल्यास सरकार कोसळेल ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार असेल, तर हा प्रकल्प इथे नको आहे. जनता याला विरोध करत असेल, तर माझाही त्याला विरोध असेल -उद्धव ठाकरे