मुके बिचारे…!

यवतमाळ जिल्ह्यात वाघनखे मिळवण्यासाठी एका वाघिणीला मारण्यात आले. कुणाच्याही अंगावर शहारे येतील, असे माणुसकीला काळीमा फासणारे हे वृत्त आहे. मानवातील पशुत्वाचे दर्शन घडवणारे हे कृत्य शिकारी तस्करांनी केले.

गोव्याकडून सर्वोच्च न्यायालयाला कळसा-भंडुरा प्रकल्पाविषयीचा अहवाल सादर

म्हादई नदी ही गोव्याची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे म्हादई नदीतील पाणी वळवल्यास गोव्यात पर्यावरणाचा र्‍हास होईल.’’

वन्य प्राण्यांची शिकार करणार्‍या ४ जणांवर गुन्हा नोंद !

रुवले गावाच्या सीमेत प्लास्टिक बाँबच्या साहाय्याने शिकार केल्याचे आरोपींनी मान्य केले आहे. आरोपींवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७३ कलम ९, ३९, ४४ (१), आणि ५१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

खाद्यपदार्थांचे प्लास्टिक पॅकेट रिसायकल करण्यास अनुमती द्या !

ग्राहकाने प्लास्टिक बाटली कचर्‍यात फेकण्याऐवजी दुकानदाराला परत दिल्यास पैसे देण्याची योजना एफ्.एस्.एस्.ए.आय.कडून बनवली जात आहे.

कर्नाटकने पाणी वळवल्याने म्हादई नदीचे २० किलोमीटर अंतरापर्यंतचे पात्र कोरडे !  सुदिन ढवळीकर

म्हादई नदी आता आमच्या हातात राहिलेली नाही. या नदीचे पाणी कळसा भंडुरा प्रकल्पाद्वारे मलप्रभा नदीत वळवण्यात आले आहे.

विज्ञानाच्या अतिरेकामुळे आजची युवा पिढी निसर्गापासून पुष्कळ दूर जाणे

‘पूर्वीच्या काळातील लोक निसर्गाच्या साहाय्याने अनेक गोष्टींचा अभ्यास करून ‘पुढे काय होणार ?’, हे सांगत होते. पूर्वीच्या काळी आपले ऋषिमुनी सर्व काही निसर्गात पहात होते आणि त्याला प्रार्थनाही करत होते. आजच्या युवा पिढीला काही पहायचे असेल, तर ते ‘गूगल’ या प्रणालीवर अवलंबून आहेत.

तम्नार वीजवाहिनी प्रकल्पाच्या विरोधात ‘गोवा फॉऊंडेशन’ची जनहित याचिका

तम्नार ४०० केव्ही उच्चदाब वीजवाहिनी प्रकल्पाच्या विरोधात ‘गोवा फॉऊंडेशन’ ही पर्यावरणप्रेमी संघटना आणि प्रकल्पाची झळ पोचणारे भूमीचे ५ मालक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठांत २ निरनिराळ्या जनहित याचिका (पी.आय.एल्.) प्रविष्ट केल्या आहेत.

पृथ्वीवरील कार्बन अल्प करण्यासाठी बांबूची लागवड करा ! – पाशा पटेल, माजी अध्यक्ष, पर्यावरण अभ्यासक तथा कृषीमूल्य आयोग

‘पृथ्वीवर आता मानवजात जिवंत रहाणार नाही’; कारण पृथ्वीवरचे तापमान आणि कार्बन हे दोन्ही वाढत आहे. वर्ष २०२४ मध्ये पृथ्वीचे तापमान वाढणार आहे आणि ज्या दिवशी ते अडीच अंशाने वाढेल, त्या दिवशी पृथ्वीवर माणूस जगणार नाही, अशी भीतीही या कराराच्या वेळी व्यक्त करण्यात आली होती.

अवेळी पावसामुळे विदर्भातील वातावरण गारठले

तुरळक गारपिटीमुळे संपूर्ण पूर्व विदर्भातील वातावरण गारठले आहे.

एका झाडाचे वार्षिक मूल्य ७४ सहस्र ५०० रुपये, तर १०० जुन्या झाडाचे मूल्य १ कोटी रुपयांहून अधिक ! – सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ञ समितीची अहवाल

सरकारने आता समुद्र, तसेच रेल्वे मार्गांवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. वृक्षतोड अल्प प्रमाणात होईल, अशा प्रकल्पांना सरकारने प्राधान्य दिले पाहिजे.