वन्य प्राण्यांची शिकार करणार्‍या ४ जणांवर गुन्हा नोंद !

वन्य प्राण्यांची शिकार करणार्‍या ४ जणांवर वन विभागाने कारवाई केली आहे.

सातारा, १ एप्रिल (वार्ता.) – कराड तालुक्यातील ढेबेवाडी येथील वाल्मिकी पठारावर वन्य प्राण्यांची शिकार करणार्‍या ४ जणांवर वन विभागाने कारवाई केली आहे. रुवले गावाच्या सीमेत प्लास्टिक बाँबच्या साहाय्याने शिकार केल्याचे आरोपींनी मान्य केले आहे. आरोपींवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७३ कलम ९, ३९, ४४ (१), आणि ५१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गत मासापासून काही समाजकंटक वणवा पेटवत आहेत. यामुळे वन संपत्तीसह वन्य प्राण्यांनाही जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे वन विभागाने गस्त वाढवली आहे. वन विभागाचे कर्मचारी २९ मार्चच्या मध्यरात्री २.३० वाजता सणबुर-रुवले रस्त्यावर पाटीलवाडीजवळ गस्त घालत होते. तेव्हा एक चारचाकी गाडी दिसली. गाडीची पडताळणी केली असता त्यामध्ये रानडुकराचे मांस आढळून आले. गाडीमध्ये ५ जण होते. ४ जणांना कह्यात घेण्यात आले; मात्र एकजण पळून गेला.