विज्ञानाच्या अतिरेकामुळे आजची युवा पिढी निसर्गापासून पुष्कळ दूर जाणे

 

‘पूर्वीच्या काळातील लोक निसर्गाच्या साहाय्याने अनेक गोष्टींचा अभ्यास करून ‘पुढे काय होणार ?’, हे सांगत होते. पूर्वीच्या काळी आपले ऋषिमुनी सर्व काही निसर्गात पहात होते आणि त्याला प्रार्थनाही करत होते. ‘प्रकृतीला कोणत्याही प्रकारची हानी पोचू नये’, यासाठी काळजी घेऊन ते निसर्गाची पूजाही करत होते. ते सर्वजण निसर्गाशी एकरूप होते. पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांचे सळसळणे, प्राण्यांचे दिसणे आणि ढग यांच्याकडे पाहून त्यांना निसर्गात शुभ अन् अशुभ होणार्‍या गोष्टींचे संकेत मिळत होते. त्यात ते निपुणही होते. विज्ञानाच्या अतिरेकीपणामुळे आजच्या युवा पिढीला निसर्गापासून पुष्कळ दूर नेले आहे. आजच्या युवा पिढीला काही पहायचे असेल, तर ते ‘गूगल’ या प्रणालीवर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांना ‘निसर्गात देवत्व न दिसता केवळ मनोरंजन दिसते’, हे आपले दुर्भाग्य आहे.’

– श्री. गुरुप्रसाद गौडा, मंगळुरू (२.१२.२०२०)