या वर्षी भारतात १० दिवस आधीच पावसाळ्याला प्रारंभ होणार !

नवी देहली – बंगालच्या उपसागरात, तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वातावरणीय पालटांमुळे पावसाळा लवकर येणार आहे, असा अंदाज ‘युरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर’ या संस्थेने वर्तवला आहे. अंदमान येथे पावसाळ्याला प्रारंभ होतो. यावर्षी २० किंवा २१ मे या दिवशी अंदमानमध्ये पावसाळ्याला प्रारंभ होईल. अंदाजानुसार केरळमध्ये २८ ते ३० मे या काळात पावसाळा चालू होऊ शकतो. यानंतर महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे.