‘माझी वसुंधरा’ अभियानात अमृत गटामध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतांना महापौर दिग्विजय सूर्यवंशी (डावीकडे), तसेच अन्य

सांगली, ६ जून (वार्ता.) – ‘माझी वसुंधरा अभियान २.००’ अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या निसर्गाचे संबंधित पंचतत्त्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या अंतर्गत अमृत गटांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरांमध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. याचे पारितोषिक वितरण ५ जून या दिवशी टाटा थिएटर, मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपायुक्त राहुल रोकडे, पर्यावरण अभियंता वैष्णवी कुंभार उपस्थित होते.