विधानसभा अध्यक्षांची मुख्यमंत्र्यांशी भेट म्हणजे न्यायमूर्तींनी आरोपीला भेटणे होय ! – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २ वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. न्यायमूर्तीच आरोपीला घरी जाऊन भेटत असतील, तर कोणत्या निकालाची अपेक्षा करायची ? यांची मिलिभगत आहे का ?

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ‘ईडी’ची धाड !

जुलै २०२१ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना ‘जोगेश्वरी येथील मुंबई महानगरपालिकेच्या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी ५०० कोटी रुपयांचे पंचतारांकित हॉटेल बांधले’, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

मलंगगडाविषयी जनतेच्या मनातील भावना लवकरच पूर्ण होतील ! – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,  शिवसेना

श्री मलंगगडाविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्‍वासन ते नक्कीच पूर्ण करतील. श्री मलंगगडाची मुक्तता करू’, असे आश्‍वासन दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रायगड दौर्‍यात १४ कोटींच्या प्रशासकीय भवनाचे लोकार्पण !

मागील दोन वर्षांपासून या नवीन प्रशासकीय भवन उभारण्याच्या कामाला गती येऊन ते आता पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येत्या ७ जानेवारीला या प्रशासन भवनाचे लोकार्पण होणार आहे.

Eknath Shinde:कोकणातील जनता शिवसेनेच्या मागे भक्कम उभी राहील !  

कोकणच्या विकासासाठी ‘कोकण विकास प्राधिकरणा’ची स्थापना करून त्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, यापुढे कोकण मागास रहाणार नाही, तर राज्यात  अव्वल असेल.

‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३’ अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला विभाग स्तरावरील प्रथम क्रमांक घोषित !

– ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३’ अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला विभाग स्तरावरील प्रथम क्रमांक घोषित करण्यात आला असून त्यात २ कोटी रुपयांचे पारितोषिक महापालिकेला मिळणार आहे.

मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, तसेच वृद्ध कलावंतांचे मानधन वाढवण्यात येईल. ज्येष्ठ कलावंतांच्या घराविषयीही शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

मलंगगडमुक्तीच्या भावना पूर्ण केल्याविना स्वस्थ बसणार नाही !- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

मलंगगडाच्या संदर्भातील तुमच्या सर्वांच्या भावना मला माहिती आहेत. या मलंगगडावर येऊन शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांनी मलंगगड मुक्तीसाठी आंदोलन चालू केले.

मुंबई ते अयोध्या रेल्वे चालू व्हावी ! – मुख्यमंत्री

मुंबई-अयोध्या रेल्वेगाडी चालू व्हावी, अशी इच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ३१ डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जालना-मुंबई ही ‘वंदे भारत’ रेल्वे आल्यावर त्यांनी तिचे स्वागत केले.

राज्यभरात ‘सर्वंकष स्वच्छता मोहीम’ राबवण्यात येईल ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

ज्याप्रमाणे आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, तरच ठाणे निरोगी होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहीम ३० डिसेंबरपासून ठाणे येथून चालू झाली.