कोल्हापूर : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मला कोल्हापूर खंडपिठाच्या विषयाच्या संदर्भात माहिती दिली आहे. कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ मुंबईत आल्यावर त्यांच्यासमवेत बैठक घेऊ, तसेच राज्याचे मुख्य न्यायाधीश यांनाही विनंती करून हा विषय मार्गी लावू, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. १० ऑगस्टला कोल्हापूर खंडपिठाच्या निर्मितीसाठी कोल्हापूर, सांगलीसह ६ जिल्ह्यांतील अधिवक्त्यांची कोल्हापूर येथे परिषद झाली. यानंतर कृती समितीच्या समन्वयकांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरभाषद्वारे संवाद साधला. त्यात समितीला मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले.