३ वर्षांनी आढावा घेऊन ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना’ पुढे राबवण्याचे ठरवू ! – मुख्यमंत्री


मुंबई
– ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना’ वर्ष २०२९ पर्यंत आहे; मात्र ३ वर्षांनी या योजनेचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतरच पुढील कालावधीत योजना राबवण्याविषयीचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

या योजनेच्या अंतर्गत ७.५ अश्वशक्तीपर्यंत शेतीपंप असलेल्या राज्यातील शेतकर्‍यांना विनामूल्य वीज देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात ४७ लाख ४१ सहस्र कृषीपंप ग्राहक आहेत. यांतील ४५ लाख कृषीपंपधारकांना या योजनेचा लाभ होणार आहे.