या शैक्षणिक वर्षात ८०० हून अधिक तंत्रशिक्षण महाविद्यालयांचा शुल्कवाढ न करण्याचा निर्णय !

राज्यातील ८०० हून अधिक विनाअनुदानित तंत्रशिक्षण महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०२२ – २०२३ मध्ये शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तूकला, व्यवस्थापनशास्त्र आदी महाविद्यालयांचा यांत समावेश आहे.

उज्ज्वल भारतासाठी मुलांमध्ये जिज्ञासू वृत्ती जागृत करण्याची आवश्यकता ! – डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

उज्ज्वल भारतनिर्मितीसाठी मुलांमध्ये जिज्ञासू वृत्ती जागृत करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी वाशी येथे केले.

कोरोनामुळे चीनमधून परतलेल्या २० सहस्र भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा व्हिसा देण्यास चीनचा नकार !

चीनच्या अशा डावपेचांना भारत कसे उत्तर देणार ? भारताने चीनच्या आस्थापनांवर बंदी घालणे, हाच यावरील सर्वांत परिणामकारक उपाय आहे !

नेमणूक झालेल्या शाळेत रुजू न झाल्यास शिक्षकांना वेतन मिळणार नाही ! – प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

आवडीनिवडी बाजूला ठेवून विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करणारे शिक्षक हवेत. या उदाहरणातून शिक्षकांना स्वतःच्या कर्तव्याचे दायित्व वाटावे यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता अधोरेखित होते !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये गेली १२ वर्षे कंत्राटी पद्धतीने प्राध्यापकभरती !

विद्यापिठामध्ये कंत्राटी पद्धतीने प्राध्यापकांची भरती केली जाणे, हे गंभीर आहे. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी पुरेसे प्राध्यापक असणे आवश्यक आहे. प्राध्यापकांची पदे रिक्त ठेवण्यामागील नेमकी कारणे पुढे येणे आवश्यक आहे !

नाशिक येथील १८ अनधिकृत शाळांना टाळे ठोकण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय !

१८ अनधिकृत शाळा निर्माण होईपर्यंत शिक्षण विभाग आणि प्रशासन काय करत होते ? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी !

‘एम्स परिवारा’च्या वतीने वाराणसी येथे शैक्षणिक कार्यासाठी दिल्या जाणार्‍या पुरस्काराने डॉ. जगन्नाथ पाटील सन्मानित !

‘एम्स परिवारा’च्या वतीने सारनाथ, वाराणसी येथे शैक्षणिक कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार लातूर येथील डॉ. जगन्नाथ पाटील यांना देण्यात आला. श्रीमान इंद्रेशकुमारजी आणि केंद्रीय तिब्बत विद्यापिठाचे कुलपती डॉ. गेशे समतेनजी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

भारत विश्वगुरु व्हावा !

गुरुकुल शिक्षणपद्धत अस्तित्वात असतांना विश्वगुरुपदी विराजमान असणारा भारत सर्वांनाच अभिप्रेत आहे. गुरुकुल पद्धतीचे पुनरुज्जीवन झाल्यासच ते शक्य होईल. हे सर्वस्वी ‘भारतीय शिक्षण बोर्डा’च्या हातात आहे. आदर्श आणि उज्ज्वल भारत घडवण्यासाठी ‘भारतीय शिक्षण बोर्डा’च्या पुढील वाटचालीस सर्व भारतियांच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

जामखेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधांची वानवा !

शिक्षणासारख्या सेवा पुरवतांना मूलभूत सुविधा नसणे, हे गंभीर आणि संतापजनक आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांची ही दूरवस्था होण्यास कारणीभूत असणार्‍यांना कडक शासनच हवे !

भारतात मात्र नमाजासाठी शुक्रवारी मिळते सुटी !

बांगलादेशच्या शिक्षण मंत्रालयाने शालांत परीक्षेचे वेळापत्रक घोषित केले आहे. यात दुर्गापूजेच्या वेळी परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.