या शैक्षणिक वर्षात ८०० हून अधिक तंत्रशिक्षण महाविद्यालयांचा शुल्कवाढ न करण्याचा निर्णय !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – राज्यातील ८०० हून अधिक विनाअनुदानित तंत्रशिक्षण महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०२२ – २०२३ मध्ये शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तूकला, व्यवस्थापनशास्त्र आदी महाविद्यालयांचा यांत समावेश आहे. राज्यातील विनाअनुदानित तंत्रशिक्षण महाविद्यालयांना ‘शुल्क निर्धारण प्राधिकरणा’कडून (एफ्.आर्.ए.) प्रतिवर्षी शुल्क मान्य करून घ्यावे लागते; मात्र या वर्षी महाविद्यालयांच्या शुल्कवाढ करण्याच्या निर्णयाला ‘शुल्क निर्धारण प्राधिकरणा’कडून मान्यता मिळाली आहे.

कोरोना महामारीच्या संसर्गाच्या काळात शैक्षणिक कामकाज ऑनलाईन पद्धतीने चालू असल्याने विद्यार्थ्यांनी शुल्कमाफी आणि शुल्क सवलतीची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी लाभदायक आहे.