राज्‍यात शिष्‍यवृत्तीचे १४ सहस्र ५७७ अर्ज प्रलंबित ! – उच्‍च शिक्षण सहसंचालकांची माहिती

‘महाडीबीटी’ या संकेतस्‍थळावरील शिष्‍यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्‍यांनी ऑनलाईन अर्ज केल्‍यानंतर त्‍याची पडताळणी महाविद्यालयात होते; मात्र त्‍यानंतरही शिष्‍यवृत्ती अर्ज प्रलंबित रहात आहेत.

कोणत्‍याही शासकीय शाळेतील वीजपुरवठा खंडित होणार नाही ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

थकित वीज देयकांसाठी प्राथमिक शाळांसह सार्वजनिक गोष्‍टींचा विद्युत् पुरवठा खंडित करू नये, यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करून या प्रश्‍नावर कायमस्‍वरूपी तोडगा काढण्‍यात येईल.

तमिळनाडूत मंदिरांकडून चालवण्यात येणार्‍या शाळा सरकारच्या नियंत्रणाखाली आणणार !

तमिळनाडूचे अर्थमंत्री पलानीवेल त्यागराजन् यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्या वेळी त्यांनी अन्य संस्था आणि सरकारी विभाग यांच्याकडून चालवण्यात येणार्‍या शाळा राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली आणणार असल्याचे म्हटले आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधील विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांना हिजाब अपरिहार्य !

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान शिक्षण विभागाने आदेश काढूद शाळांमध्ये विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांना हिजाब वापरणे अनिवार्य केले आहे.

राज्‍यातील खासगी माध्‍यमिक शाळा चालवायला सरकार सिद्ध आहे ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

राज्‍यातील प्राथमिक, माध्‍यमिक आणि माध्‍यमिक खासगी शाळांना वेतनेतर अनुदान द्यावे, यासाठी विधान परिषदेत उपस्‍थित केलेल्‍या तारांकित प्रश्‍नावर शिक्षणमंत्र्यांनी वरील सिद्धता दर्शवली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेत ७१ सहस्र ३१५ अर्ज प्राप्त !

२८ फेब्रुवारी ही या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक होती. मार्चअखेर एका वर्षाची शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसर्‍या वर्षाच्या शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

फ्रान्समध्ये शिक्षण घेणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ व्हावी ! – एडोआर्ड फिलिफ, फ्रान्सचे माजी पंतप्रधान

फ्रान्समध्ये भारतातील १० सहस्र विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. भविष्यात या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ व्हावी आणि भारत-फ्रान्स यांच्यातील संबंध आणखी दृढ व्हावेत, असे मत फ्रान्सचे माजी पंतप्रधान आणि ले हाव्रेचे सध्याचे महापौर एडोआर्ड फिलिफ यांनी व्यक्त केले.

इयत्ता दहावी आणि बारावी यांच्या परीक्षांमध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद !

सर्वाधिक ३ गुन्हे अमरावती विभागात, प्रत्येकी २ गुन्हे पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर विभाग, तर १ गुन्हा मुंबई विभागीय कार्यालयांतर्गत नोंद झाले आहेत. यावर्षी सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे.

योगऋषी रामदेवबाबा यांनी हिंदु तरुण-तरुणींसाठी आयोजित केला संन्यास महोत्सव !

योगऋषी रामदेवबाबा यांनी येत्या २२ मार्च ते ३० मार्च (श्रीरामनवमी) या कालावधीत संन्यास महोत्सवाचे आयोजन केले आहे. यात ज्यांना संन्यासी व्हायचे आहे, ते अर्ज करू शकणार आहेत.

‘विजयदुर्ग’च्या दुरवस्थेविषयी जिल्हाधिकार्‍यांनी कार्यवाही करावी ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

विजयदुर्ग ऐतिहासिक दुर्गाच्या माहितीचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्याविषयी अभ्यास करून निर्णय घेऊ ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री