संभाजीनगर येथील ९० टक्के शिक्षक गावात न रहाता खोटी कागदपत्रे सादर करून घरभाडे घेतात ! – आमदार प्रशांत बंब यांचा आरोप   

राज्यातील जवळपास ७० टक्के शिक्षक गावात रहात नाहीत. ते खोटी कागदपत्रे सादर करून घरभाडे घेतात, असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी २ सप्टेंबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

प्राध्यापक : भारतीय उपखंडातील भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक !

भारताला अधोगतीला घेऊन जाण्याचे मूळ हे शिक्षणव्यवस्थेत असल्याने त्यामध्ये आमूलाग्र पालट होणे अत्यावश्यक !

तुर्कीयेमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘जिहाद’चे धडे !

इस्लामी देशांमध्ये जिहादी, धर्मांध किंवा आतंकवादी यांची निर्मिती का होते ?’, हे यातून स्पष्ट होते !

प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेतून देण्यासाठीचा उपक्रम राबवणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र  

राज्यातील प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी बोली भाषा आहे. या बोली भाषेतून प्राथमिक शिक्षण मुलांना दिले, तर ते अधिक चांगले होणार आहे. या बोली भाषेच्या माध्यमातूनच मग त्यांना हळूहळू प्रमाण भाषेकडे नेल्यास त्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम होईल.

सध्याच्या शिक्षणपद्धतीत पालट घडवून आणण्याची नितांत आवश्यकता ! – सरन्यायाधीश रमणा

भारताचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी सध्याच्या शिक्षणपद्धतीविषयी खंत व्यक्त करत ती ब्रिटीशकालीन पद्धतीसारखीच असल्याचे सांगितले. यामध्ये पालट घडवून आणण्याची नितांत आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्रात मराठी शाळांची दुरवस्था, तर उर्दू शाळांना मात्र भरमसाठ अनुदान !

मराठीप्रेमींनो, मराठी शाळांची दुःस्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांनाही अनुदान मिळावे, यासाठी कृतीशील व्हा !

या शैक्षणिक वर्षात ८०० हून अधिक तंत्रशिक्षण महाविद्यालयांचा शुल्कवाढ न करण्याचा निर्णय !

राज्यातील ८०० हून अधिक विनाअनुदानित तंत्रशिक्षण महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०२२ – २०२३ मध्ये शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तूकला, व्यवस्थापनशास्त्र आदी महाविद्यालयांचा यांत समावेश आहे.

उज्ज्वल भारतासाठी मुलांमध्ये जिज्ञासू वृत्ती जागृत करण्याची आवश्यकता ! – डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

उज्ज्वल भारतनिर्मितीसाठी मुलांमध्ये जिज्ञासू वृत्ती जागृत करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी वाशी येथे केले.

कोरोनामुळे चीनमधून परतलेल्या २० सहस्र भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा व्हिसा देण्यास चीनचा नकार !

चीनच्या अशा डावपेचांना भारत कसे उत्तर देणार ? भारताने चीनच्या आस्थापनांवर बंदी घालणे, हाच यावरील सर्वांत परिणामकारक उपाय आहे !

नेमणूक झालेल्या शाळेत रुजू न झाल्यास शिक्षकांना वेतन मिळणार नाही ! – प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

आवडीनिवडी बाजूला ठेवून विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करणारे शिक्षक हवेत. या उदाहरणातून शिक्षकांना स्वतःच्या कर्तव्याचे दायित्व वाटावे यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता अधोरेखित होते !