पुणे विद्यापिठातील पदवी प्रदान समारंभ बंद होणार ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

पुणे – राज्यातील विद्यापिठे आणि संलग्न महाविद्यालये येथील पदवी प्रदान समारंभ बंद होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र ‘डीजी लॉकर’मध्ये (प्रत्यक्ष कागदपत्रांऐवजी ती नागरिकांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्याची सुविधा) उपलब्ध होणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. काळा झगा आणि मोठ्या टोप्या घालून भव्य पदवी प्रदान समारंभ करण्याची आवश्यकता नाही, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थी ‘डीजी लॉकर’ वापरून प्रमाणपत्र कुठेही आणि कधीही उपलब्ध करून घेऊ शकतात. या संदर्भातील सूचना लवकरच प्रसिद्ध होईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.