‘पालट घडवूया’ अभियानाद्वारे राज्‍यातील ६४ सहस्र शाळांमधील ३८ लाख विद्यार्थी देणार स्‍वच्‍छतेचा संदेश !

विद्यार्थी ‘स्‍वच्‍छता मॉनिटर्स’ म्‍हणून काम करणार आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे २३ ऑगस्‍ट या दिवशी या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या वेळी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘या अभियानाद्वारे राज्‍यातील स्‍वच्‍छतेमध्‍ये आमूलाग्र पालट होईल’, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला आहे.

नवी मुंबईत शिक्षण विभागाकडून तासिका तत्त्वावर १७८ शिक्षकांची भरती पूर्ण !

नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या ५३ प्राथमिक आणि २३ माध्‍यमिक शाळांसाठी तासिका तत्त्वावर तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात शिक्षक नियुक्‍ती करण्‍याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला होता.

अविचारी नेतृत्‍व नको !

अशी परीक्षा रहित करून काय साध्‍य होणार ? राष्‍ट्रीय पातळीवर घेण्‍यात येणार्‍या या परीक्षेतून केवळ एका राज्‍यातील विद्यार्थ्‍यांना सवलत देणे, हे ‘नॅशनल टेस्‍टिंग एजन्‍सी’च्‍या कार्यप्रणालीत बसेल का ?

नवी मुंबईत शिक्षण विभागाकडून तासिका तत्त्वावर १७८ शिक्षकांची भरती पूर्ण !

महापालिकेच्‍या शिक्षण विभागाच्‍या वतीने मागील मासापासून चालू केलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. १८३ पैकी १७८ शिक्षकांची भरती करण्‍यात आली आहे, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्‍त दत्तात्रय घनवट यांनी दिली. तासिका तत्त्वावर तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात या शिक्षकांची नेमणूक करण्‍यात आली आहे.

(म्हणे) ‘विद्यापिठाच्या आवारात मद्यप्राशन करणे, हा आमचा अधिकार !’-मद्यप्रेमी विद्यार्थिनी

विद्यापिठात ज्ञानार्जन करणे, हा आमचा अधिकार आहे’, असे म्हणण्याऐवजी विद्यार्थ्यांना ‘तेथे मद्यप्राशन करणे’ हा त्यांचा अधिकार वाटत असेल, तर अशा युवापिढीच्या हाती देशाचे भवितव्य सुरक्षित आहे का ?

राज्यातील निरक्षरांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण होणार !

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना ‘साक्षरतेतून समृद्धीकडे’ जाण्यासाठी ‘नवभारत साक्षरता’ कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्या अंतर्गत १५ वर्षे आणि त्या पुढील वयाच्या निरक्षरांचा शोध घेण्यासाठी राज्यात १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीमध्ये सर्वेक्षण केले जाणार आहे.

‘अनअकॅडमी’ आस्थापनाने पंतप्रधानांचा अवमान करणार्‍या करण संगवान या शिक्षकाला कामावरून काढले !

वैयक्तिक भूमिका विद्यार्थ्यांसमोर मांडणे चुकीचे आहे. आम्ही शिक्षणाचे एक व्यासपीठ आहोत. चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जावे, ही आमची बांधिलकी आहे.

संयुक्‍त राष्‍ट्रांसमवेत राज्‍यात महिलांसाठी राबवण्‍यात येणार विविध विकास योजना !

१७ ऑगस्‍ट या दिवशी महिला आणि बाल विकासमंत्री कु. अदिती तटकरे आणि संयुक्‍त राष्‍ट्राच्‍या महिला परिषदेच्‍या प्रतिनिधी यांच्‍यासमवेत सामंजस्‍य करार झाला.

संस्‍कृतमुळे सुसंस्‍कृत !

लंडन शहराच्‍या मध्‍यवर्ती भागात असणार्‍या ‘सेंट जेम्‍स इंडिपेन्‍डंट स्‍कूल’ या शाळेतील विद्यार्थ्‍यांसाठी संस्‍कृत भाषेचे शिक्षण सक्‍तीचे करण्‍यात आले आहे. ‘संस्‍कृत भाषेमुळे विद्यार्थ्‍यांना गणित, विज्ञान आणि इतर भाषा शिकणे सोपे जाते’, असे संस्‍कृत विभागाचे प्रमुख यांचे मत आहे.