‘अनअकॅडमी’ आस्थापनाने पंतप्रधानांचा अवमान करणार्‍या करण संगवान या शिक्षकाला कामावरून काढले !

विद्यार्थ्यांना ‘सुशिक्षित उमेदवारांना मत द्या’ असे सांगून पंतप्रधान मोदी यांच्यावर शिक्षकाने टीका केल्याचे प्रकरण

नवी देहली – येथील ‘अनअकॅडमी’ या मुलांना ऑनलाईन शिक्षण देणार्‍या आस्थापनाच्या करण संगवान या शिक्षकाने काही दिवसांपूर्वी ‘सुशिक्षित उमेदवारांना मत द्या. तसेच अशा व्यक्तीला निवडून द्या, ज्या व्यक्तीला गोष्टी समजत असतील’, असे त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगितले होते. संगवान यांचा रोख पंतप्रधान मोदी यांच्याकडे होता, असे सांगितले जात आहे. यावरून सामाजिक माध्यमांवर त्यांना पुष्कळ विरोध झाला. विषयाचे गांभीर्य पहाता ‘अनअकॅडमी’ने संगवान यांना कामावरून काढले.

आस्थापनाचे सहसंस्थापक रोमन सैनी यांनी ट्वीट करून सांगितले की, अशा प्रकारे वैयक्तिक भूमिका विद्यार्थ्यांसमोर मांडणे चुकीचे आहे. आम्ही शिक्षणाचे एक व्यासपीठ आहोत. चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जावे, ही आमची बांधिलकी आहे. वर्ग हे काही वैयक्तिक मते मांडण्याचे ठिकाण नसते. अशातच १९ ऑगस्टच्या रात्री ८ वाजता करण संगवान त्यांच्या ‘यूट्यूब चॅनल’वर सविस्कर भूमिका मांडणार आहेत, असे त्यांनी जाहीर केले आहे.