खवल्यांची तस्करी करणार्‍या रत्नागिरी जिल्ह्यातील दोघांना कुपवाड येथे अटक

पोलिसांनी संशयित इम्रान अहमद मुलाणी, अलोरे आणि दिनेश गोपाळ डिंगणकर चिंद्रवळे, यांच्याकडून ४ किलो ७५० ग्रॅम वजनाची अनुमाने ११ लक्ष ८७ सहस्र ७०० रुपये किमतीची खवले हस्तगत केले.

अमेरिकेला गंभीर आर्थिक संकटाचा धोका

अमेरिका ही जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. जर अमेरिकेने चूक केली, तर त्याचा संपूर्ण जगावर परिणाम होईल.आर्थिक संकटामुळे अमेरिकेत सुमारे ७० लाख लोकांच्या नोकर्‍या जाऊ शकतात.

गायरान भूमीवरील ७०० हेक्टरहून अधिक अतिक्रमण हटवणार !

इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? यास उत्तरदायी असलेल्यांना सरकारने आजन्म कारागृहात पाठवण्याची शिक्षा केली पाहिजे !

‘अ‍ॅपल’ आस्थापनाला भारतियाने १३८ कोटी रुपयांना फसवले !

अमेरिकेत ३ वर्षे कारावास आणि १५५ कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा !

वीजकपात करण्यासाठी पंजाबमधील सरकारी कार्यालये सकाळी ७.३० ते दुपारी २ या वेळेत चालू रहाणार !

सरकारची होणार ७० कोटी रुपयांची बचत !

गोवा : बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुविधांसाठीचा ५०० कोटी रुपयांचा निधी विनावापर पडून !

बांधकाम क्षेत्रात काम करणारे बहुतांश कामगार अत्यंत हालाखीचे जीवन जगत असतांना त्यांच्या कल्याणासाठी देण्यात आलेला ५०० कोटी रुपयांचा निधी सरकारच्या तिजोरीत विनावापर पडून ! ही माहिती स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच दिली !

बोरगाव (जिल्हा सांगली) येथील मारुति पाटील पतसंस्थेत अडीच कोटी रुपयांचा अपहार : तिघांना अटक

या प्रकरणी सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पतसंस्थेचे अध्यक्ष स्नेहलकुमार मानसिंग पाटील, उपाध्यक्ष प्रकाश आनंदराव पाटील (दोघेही रा. बोरगाव), सचिव अरविंद जनार्दन पाटील (रा. कापूसखेड) यांना अटक केली असता आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी प्रशासन आणि शासन कटीबद्ध ! –  जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रेसर रहावा, यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहेत. यामध्ये स्थानिक आणि नागरिक यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

सरकारी सेवेत रुजू झाल्यावर प्रलोभनांना बळी पडू नका ! – अजित पवार

सरकारी सेवेमध्ये लागल्यानंतर कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता योग्य काम करावे, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पोलीस भरती मध्ये रुजू झालेल्या विद्यार्थ्यांना दिला.

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना करातून मिळाले ११५ कोटी रुपयांचे उत्पन्न !

ग्रामपंचायती वार्षिक कर आकारणी करतात. मार्च मासाच्या शेवटी हा कर ग्रामपंचायतीमध्ये भरावा लागतो. यासाठी विशेष करवसुली मोहीम राबवून करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागते.