बोरगाव (जिल्हा सांगली) येथील मारुति पाटील पतसंस्थेत अडीच कोटी रुपयांचा अपहार : तिघांना अटक

( प्रतिकात्मक छायाचित्र )

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) – वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील मारुति पाटील पतसंस्थेत २ कोटी ४७ लाख ६२ सहस्र रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पतसंस्थेचे अध्यक्ष स्नेहलकुमार मानसिंग पाटील, उपाध्यक्ष प्रकाश आनंदराव पाटील (दोघेही रा. बोरगाव), सचिव अरविंद जनार्दन पाटील (रा. कापूसखेड) यांना अटक केली असता त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सहकारी संस्थेचे लेखापरीक्षक राजेंद्र पाटील यांनी पतसंस्थेच्या वर्ष २०१७ ते २०२१ या काळात केलेल्या लेखापरीक्षणात अपहार उघडकीस आला. लेखापरीक्षकांनी तक्रार दिल्यावर गुन्हा नोंद झाला. हा गुन्हा सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. यात कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून कर्ज येणे असतांना कर्जदारांना ना हरकत दाखले आणि बोजा नोंद अल्प करून देणे, अपहाराची रक्कम वैयक्तिक अन्य उद्योगांसाठी वापरणे अशा गोष्टींचा समावेश आहे.